शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
2
मिचेल स्टार्कचा 'Spark'! ट्रॅव्हिस हेडचा भन्नाट चेंडूवर उडवला त्रिफळा, Video 
3
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
4
निकालानंतर उद्धव ठाकरे पुन्हा भाजपासोबत जातील?; शरद पवारांचं मोठं विधान
5
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
6
फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?
7
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
8
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
9
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
10
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
11
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
12
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
13
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
14
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
15
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
16
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध
17
Gold Price Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सोन्याचे दर पुन्हा घसरले
18
PM मोदींच्या वक्तव्यानंतर सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी, कोल इंडियाबाबत ब्रोकरेज बुलिश, म्हणाले...
19
T20 WC 2024: "रिंकू एकमेव खेळाडू आहे जो...", 'भज्जी'ने टीम इंडियासाठी सांगितली रणनीती
20
Closing Bell: शेअर बाजाराचं मार्केट कॅप $५ ट्रिलियन पार; मेटल शेअर्समध्ये तेजी, बँक-आयटी घसरले

"अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यासाठी घटना सार्वजनिक दृष्टिपथात होणे आवश्यक"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2020 5:49 AM

बंद दरवाजाआडची शिवीगाळ व अपमानाबद्दल या कायद्याची कलमे लावता येणार नाहीत, असा निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे.

खुशालचंद बाहेती नवी दिल्ली : अनुसूचित जाती-जमातीच्या व्यक्तीस जातीवाचक शिवीगाळ किंवा अपमान हा सार्वजनिक दृष्टिपथात झाला असेल, तरच अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टप्रमाणे गुन्हा होऊ शकतो. बंद दरवाजाआडची शिवीगाळ व अपमानाबद्दल या कायद्याची कलमे लावता येणार नाहीत, असा निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. विनोद कुमार तनय यांच्याविरुद्ध खातेनिहाय चौकशी सुरू होती. के.पी. ठाकूर हे चौकशी अधिकारी व विनोद कुमार हे चौकशीत सादरकर्ता अधिकारी होते.चौकशीसाठी येताना विनोदकुमार तनय हे एम.पी. तिवारी या सहकारी व सामाजिक कार्यकर्त्यासोबत हजर राहिले. के.पी. ठाकूर यांनी तिवारी यांना बाहेर थांबण्यास सांगितले. यानंतर विनोदकुमार तनय यांनी त्यांना के.पी. ठाकूर यांनी आपल्या कार्यालयीन चेंबरचा दरवाजा बंद करून मारहाण केली व जातीवाचक शिवीगाळ केल्याची आणि गंभीर परिणामाची धमकी दिल्याची तक्रार वरिष्ठांना व पोलिसांकडे केली. त्यांच्या तक्रारीची कोणीही दखल घेतली नाही, म्हणून त्यांनी न्यायालयात कलम ३२३ (मारहाण), ५०४ (शिवीगाळ), ५०६ (धमकी) आय.पी.सी. आणि ३ (१) (१०) अ‍ॅट्रॉसिटी कायद्याप्रमाणे तक्रार दाखलकेली.न्यायालयाने २०२ सीआरपीसीप्रमाणे चौकशी करून प्रथमदर्शनी गुन्हा दिसत असल्याचे निष्कर्ष काढून के.पी. ठाकूर यांना समन्स बजावले. यास उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.अलहाबाद उच्च न्यायालयाचे न्या. रामकृष्ण गौतम यांनी चौकशी अधिकाऱ्याचा कक्ष हा सार्वजनिक दृष्टिपथातील (पब्लिक व्ह्यू) ठिकाण नाही.याठिकाणी जरी घटना घडली असेल तरी तो अ‍ॅट्रॉसिटी कायद्याप्रमाणे गुन्हा होत नाही, असे म्हणत अ‍ॅट्रॉसिटी कायद्याची कलमे रद्द केली. चौकशी अधिकाºयाचे कार्यालय हे सार्वजनिक ठिकाण आहे. असा मुद्दा मांडण्यात आला होता. मात्र, ते सार्वजनिक ठिकाण असले तरी सार्वजनिक दृष्टिपथातील ठिकाण नाही, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले. अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा होण्यासाठी ठिकाण सार्वजनिक दृष्टिपथातील असणे आवश्यक आहे, असे न्यायालयाने स्पष्टकेले.या निकालात उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या वैजिनाथ कोंडिबा खांडके वि. महाराष्ट्र सरकार या प्रकरणातील निकालाचाही संदर्भ घेतला आहे.>जेव्हा एखाद्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकाºयाविरुद्ध कनिष्ठ अधिकारी पिळवणूक व त्रासाची तक्रार देतो तेव्हा न्यायालयाने ती अतिशय काळजीपूर्वक तपासली पाहिजे. वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांचे अधिकार सुरक्षित ठेवलेच पाहिजेत; तरच ते आपल्या हाताखालच्या लोकांकडून काम करून घेऊ शकतील.(वैजिनाथ कोंडिबा खांडके वि. महाराष्ट्र सरकारप्रकरणात सर्वोच्च न्यायालय)

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय