मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय खासदारांनी मोदींची भेट घ्यावी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 05:18 AM2021-01-13T05:18:22+5:302021-01-13T05:18:34+5:30

अशोक चव्हाण यांनी घेतली शरद पवारांची भेट

All party MPs should meet Modi for Maratha reservation | मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय खासदारांनी मोदींची भेट घ्यावी

मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय खासदारांनी मोदींची भेट घ्यावी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील खासदारांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घ्यावी, या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी शरद पवार पुढाकार घेतील, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री व मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. 

अशोक चव्हाण यांंनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांना प्रतिक्रिया देताना चव्हाण म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबत सोमवारी (दि. ११) झालेल्या वकिलांच्या बैठकीबाबत तसेच या प्रकरणाच्या सद्य:स्थितीची माहिती पवारांना दिली. मागील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या ॲटर्नी जनरलला नोटीस दिली होती. 

मराठा आरक्षणप्रश्नी शेलार पवारांच्या भेटीला
नवी दिल्लीः   मराठा आरक्षणाचा तिढा अद्याप सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने भाजप नेते आशिष शेलार यांनी याच मुद्द्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली. ही भेट राजकीय नसल्याचा दावा दोन्ही पक्षांकडून करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयात २५ जानेवारीला होणाऱ्या सुनावणीदरम्यान राज्य सरकारने भक्कमपणे बाजू मांडावी, याचीसाठी ही भेट घेतल्याचे शेलार यांनी सांगिले. 

Web Title: All party MPs should meet Modi for Maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.