शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

तुम्ही वडिलांच्या नावावर पक्षात आलात, काँग्रेसच्या महिला नेत्याचा मिलिंद देवरांवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 1:49 PM

काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी रविवारी रात्री उशीरा अरविंद केजरीवाल यांचे कौतुक करत एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला.

नवी दिल्ली : दिल्लीतील रामलीला मैदानावर आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी रविवारी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर राजकीय नेत्यांसह अनेकांनी अरविंद केजरीवालांचे कौतुक केले आहे. मात्र, अरविंद केजरीवाल यांचे कौतुक केल्यामुळे काँग्रेसमधील नेते ट्विटरवर एकमेकांना भिडले आहेत. 

काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी रविवारी रात्री उशीरा अरविंद केजरीवाल यांचे कौतुक करत एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला. यानंतर काँग्रेसचे दिल्लीतील नेते अजय माकन यांनी मिलिंद देवरा यांच्यावर टीका केली आहे. तसेच, तुम्हाला काँग्रेस पक्ष सोडायचा असेल तर खुशाल सोडा, असा सल्लाही अजय माकन यांनी मिलिंद देवरा यांना दिला आहे. त्यानंतर दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्या आणि माजी आमदार अलका लांबा यांनीही मिलिंद देवरा यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली आहे. 

अलका लांबा यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. तुम्ही वडिलांच्या नावावर पक्षात आलात. नंतर आयतेच तिकीट मिळाले. काँग्रेसच्या लाटेत निवडून आलात आणि पहिल्यांदाच मंत्री झालात. ज्यावेळी स्वबळावर निवडणूक लढण्याची वेळ आली, त्यावेळी पराभव झाला. पक्षात पदासाठी संघर्ष करा. त्यानंतर पक्षाला शिव्या देत दुसऱ्यांचे गुणगान करत गिटार वाजवा, असे अलका लांबा यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, मिलिंद देवरा यांनी अरविंद केजरीवाल यांचा व्हिडिओ शेअर करून त्यांच्या कामाचे कौतुक केले होते. अरविंद केजरीवाल यांनी सरकारी निधी दुप्पट करून दाखविल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यामुळे दिल्ली आता आर्थिक क्षेत्रात सक्षम होत असल्याचेही त्यांनी म्हटले होते.

(केजरीवालांचे कौतुक करण्यावरून काँग्रेस नेते ट्विटरवर भिडले; 'आप'मध्ये जाण्याचा दिला सल्ला)

 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालcongressकाँग्रेसAAPआप