एकत्र राहण्यावर ठाम असलेल्या सासू-जावयाला गावात नो एन्ट्री; आली उत्तर प्रदेश सोडण्याची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 17:00 IST2025-04-25T17:00:15+5:302025-04-25T17:00:31+5:30
सासू सपना तिचा होणारा जावई राहुलसोबत पळून गेल्यानंतर ९ दिवसांनी परत आली होती. दोघांनाही गावात प्रवेश दिला गेला नाही.

एकत्र राहण्यावर ठाम असलेल्या सासू-जावयाला गावात नो एन्ट्री; आली उत्तर प्रदेश सोडण्याची वेळ
उत्तर प्रदेशच्या अलीगढमधून पळून गेल्यानंतर चर्चेत आलेल्या सासू आणि जावयाची जोडी आता फक्त यूपीमध्येच नाही तर यूट्यूबवरही लोकप्रिय झाली आहे. पण आता दोघांवरही उत्तर प्रदेश सोडण्याची वेळ आली आहे. सासू सपना तिचा होणारा जावई राहुलसोबत पळून गेल्यानंतर ९ दिवसांनी परत आली होती. दोघांनाही गावात प्रवेश दिला गेला नाही. यानंतर ते दोघे कुठे गेले याबद्दल कोणतीही माहिती नाही. पण दोघांनीही उत्तर प्रदेश सोडल्याचं म्हटलं जात आहे.
गावात परत आल्यानंतर सासूला जावयासोबतचं राहायचं होतं. हे दोघंही एकत्र राहण्यावर ठाम होते. मात्र गावकऱ्यांनी त्यांना गावात घेतलं नाही. तसेच राहुलला त्याच्या वडिलांनी संपत्तीतून बेदखल केलं आहे. राहुलचे वडील होरीलाल यांना हे नातं मान्य नाही. माझ्यासाठी माझा मुलगा मेला आहे असं त्यांनी गावकऱ्यांसमोर म्हटलं. यानंतर दोघेही जवळच्या गावांमध्ये दोन दिवस राहिले. मग त्यांनी उत्तर प्रदेश सोडलं आणि एक नवीन जीवन सुरू केलं.
"मी लग्न करेन, पण एका अटीवर..."; सासूसोबत पळून गेलेला जावई काय म्हणाला?
पोलीस किंवा तरुणाच्या वडिलांकडे याबाबत कोणतीही माहिती नाही. वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी त्यांच्या मुलाला त्यांच्या संपत्तीतून बेदखल केलं आहे. आमच्या कुटुंबाचा आता त्याच्याशी काहीही संबंध नाही. ९ दिवसांनंतर अलीगढमधील दादोन पोलीस ठाण्यात येऊन ते सरेंडर झाले होते. याच दरम्यान सासूने दिली आहे. "आम्ही खूप व्हायरल झालो होतो. आमच्या बातम्या सर्वत्र सुरू होत्या. जेव्हा जेव्हा मोबाईल पाहायचो तेव्हा फक्त आम्हीच दिसायचो" असं सासूने म्हटलं होतं.
९ दिवसांत ३ शहरं! "व्हायरल झालो, आमच्याच बातम्या सर्वत्र"; जावयासह पळून गेलेली सासू म्हणाली...
जावई राहुलने दिलेल्या माहितीनुसार, "९ दिवसांपूर्वी अलीगढहून कासगंजला गेलो होतो. तिथून दोघेही बसने बरेलीला पोहोचलो. मग तिथून थेट बिहारमधील मुझफ्फरपूर शहरात पोहोचलो. काही दिवस तिथे राहिले आणि त्यानंतर नेपाळ बॉर्डरकडे जाण्याचाही विचार केला. पण जेव्हा मी मुझफ्फरपूरमध्ये माझा मोबाईल वापरला तेव्हा मी पाहिलं की दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आमची सर्वत्र चर्चा होत आहे. यानंतर दोघांनीही स्वतःहून परतण्याचा निर्णय घेतला. मुजफ्फरपूरहून बस पकडली, वाटेत मथुरेच्या गया कट येथे उतरलो आणि नंतर खासगी गाडीने अलीगढला पोहोचलो. तिथे दादोन पोलीस ठाण्यात सरेंडर केलं."