शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
2
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
3
Ram Sutar: शिल्पकलेचा उपासक गेला! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
4
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दात म्हणाला-
5
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
6
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
7
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
8
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
9
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
10
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
11
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
12
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
13
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
14
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
15
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
16
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
17
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
18
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
19
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
20
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
Daily Top 2Weekly Top 5

धोक्याची घंटा; कोरोनामुळे लहान मुलांच्या लसीकरणात ४० टक्क्यांनी घट ; जगभरात केलेल्या सर्वेक्षणातून माहिती समोर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 12:19 IST

दर आठवड्याला अर्धवट लसीकरण झालेल्या किंवा लसीकरण न झालेली सुमारे साडेपाच लाख मुले

ठळक मुद्देपोलिओ, क्षयरोग, गोवर, कांजिण्या अशा आजारांसाठी व रोगप्रतिकारक क्षमतेसाठी लसीकरणलस न मिळाल्याने तब्बल 8 कोटी मुलांचा जीव धोक्यात असल्याची माहितीपाच वर्षांखालील मुलांचे नियमित लसीकरण वेळापत्रकानुसार होणे अत्यंत आवश्यक

प्रज्ञा केळकर-सिंगपुणे : कोरोना संक्रमणाच्या काळात लहान मुलांच्या लसीकरणात ४० टक्क्यांनी घट झाल्याचा निष्कर्ष पुढे आला आहे. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन या संस्थेने जगभरात केलेल्या सर्वेक्षणातून हे आकडे समोर आले आहेत. लसीकरणात होत असलेली घट म्हणजे भविष्यातील संकटाला दिलेले आमंत्रण आहे, अशा शब्दांत वैद्यकीय तज्ञांनी धोक्याचा इशारा दिला आहे. दर आठवड्याला अर्धवट लसीकरण झालेल्या किंवा लसीकरण न झालेली सुमारे साडेपाच लाख मुले आढळून येत आहेत.

कोरोना विषाणूच्या संसगार्मुळे सर्वच दैनंदिन व्यवहारांवर, वैद्यकीय प्रक्रिया, शस्त्रक्रिया, वेळापत्रकावर विपरीत परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनावरील उपचारांसाठी आरोग्य यंत्रणा झटत असताना इतर आजार, शस्त्रक्रिया, उपचार लांबणीवर पडले. याचाच परिणाम लहान मुलांच्या लसीकरणावर झाला आहे. लहान मुलांना घेऊन घराबाहेर पडल्यास कोरोना संसर्ग होईल, या भीतीने पालकांनी लसीकरणच लांबणीवर टाकले आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये लसीकरणासाठी येणाऱ्या १ महिना ते दीड वर्षे या वयोगटातील मुलांचे प्रमाण ५० टक्क्यांनी घटल्याचे बालरोगतज्ञ डॉ. प्रतिभा भोसले यांनी 'लोकमत'ला सांगितले. लसीकरण हा बाळाच्या संगोपनातला महत्वाचा घटक आहे. पोलिओ, क्षयरोग, गोवर, कांजिण्या अशा विविध आजारांपासून लहान मुलांचे संरक्षण व्हावे आणि त्यांच्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढावी, यादृष्टीने लसीकरण अत्यंत महत्वाचे ठरते. मात्र, कोरोना काळात कोरोनामुळे लसीकरण मोहीम रखडली आहे. लस न मिळाल्याने तब्बल 8 कोटी मुलांचा जीव धोक्यात असल्याची माहितीलजागतिक आरोग्य संघटनेने प्रसिद्ध केली आहे.भारतीय बालरोगतज्ञ संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. प्रमोद जोग म्हणाले, 'कोरोना साथीमुळे अर्धवट लसीकरण झालेल्या किंवा अजिबात लसीकरण न झालेल्या मुलांचे प्रमाण वाढत आहे.  पाच वर्षांखालील मुलांचे नियमित लसीकरण वेळापत्रकानुसार होणे अत्यंत आवश्यक आहे. पालकांच्या मनात घरातून बाहेर पडण्याबाबत भीती आहे. काही वेळा वाहनांची उपलब्धता नाही. काही ठिकाणी दवाखाने बंद आहेत. अशा परिस्थितीत लसीकरण वेळापत्रकानुसार न होता विस्कळित झाले आहे. -----लसीकरणात दिरंगाई नको : डॉ. प्रमोद जोगनवजात जन्म झालेल्या बाळाला बी.सी.जी, कावीळ आणि पोलिओ; दीड, अडीच आणि साडे तीन महिन्याला देण्यात येणा?्या ट्रिपल, हिब, हिपाटाईटिस बी, रोटा, न्यूमोनिया या लसी वेळापत्रकानुसार देण्यात याव्यात. सहा महिने पूर्ण झाल्यावर इनफ्लुएनझा प्रतिबंधक लसीची दोन  इंजेक्शन्स (महिन्याच्या अंतराने) देण्यात यावीत. नऊ महिने पूर्ण झालेल्या बाळाला गोवर, गालगुंड, जर्मन गोवर ही लस द्यावी. उन्हाळ्यात कांजिण्याचे रुग्ण देखील आढळू लागले आहेत. पंधरा महिने पूर्ण झाल्यावर बाळाला कांजिण्याची लस द्यावी. पोलिओ आणि गोवरसारखे आजार आजवर अथक प्रयत्न करून आटोक्यात आले. नियमित लसीकरणात ढिसाळपणा झाल्यास या आजारांचे प्रमाण वाढण्यास वेळ लागणार नाही. इनफ्लुएनझा, गोवर, न्यूमोनिया हे आजार  देखील  श्वसन संस्थेवर परिणाम  करतात. कोरोना बाधित रुग्णाला असे आजार झाल्यास गुंतागुंत वाढते. लसी घेतलेल्या असतील तर करोनाच्या उपचारादरम्यान या आजारांची शक्यता कमी होते.

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर