दारु, शक्तीवर्धक गोळी अन् गर्लफ्रेंड...; रूम नं. ३०१ मधून तडफडत बाहेर पडला, थोड्याच वेळात मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 18:18 IST2025-01-15T18:17:52+5:302025-01-15T18:18:18+5:30

रुण इंदोरहून ग्वाल्हेरला प्रेयसीला भेटण्यासाठी आला होता. तिला घेऊन तो थाटीपूरच्या मयूर मार्केटमधील हॉटेल मॅक्सनमध्ये गेला.

Alcohol, energy sex pills and girlfriend...; gwalher youth rushed out of room no. 301, died shortly after | दारु, शक्तीवर्धक गोळी अन् गर्लफ्रेंड...; रूम नं. ३०१ मधून तडफडत बाहेर पडला, थोड्याच वेळात मृत्यू

दारु, शक्तीवर्धक गोळी अन् गर्लफ्रेंड...; रूम नं. ३०१ मधून तडफडत बाहेर पडला, थोड्याच वेळात मृत्यू

ग्वाल्हेरमधील हॉटेलमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. एका हॉटेलमध्ये एक तरूण गर्लफ्रेंडला घेऊन आला होता. त्याचा संदिग्ध मृत्यू झाला आहे. मृत्यूपूर्वी हा तरूण त्याच्या रुममधून तडफडत बाहेर पडला होता. यानंतर काही वेळातच या तरुणाचा मृत्यू झाला. चौकशीदरम्यान पोलिसांना विचित्र गोष्ट आढळून आली. यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज लावला जात आहे. 

तरुण त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये आला होता. यावेळी त्याने येताना दारु आणि सेक्स वर्धक गोळी आणली होती. दारु पिल्यानंतर त्याने सेक्सची गोळी देखील घेतल्याचे प्रेयसीने पोलिसांना सांगितले. यानंतर काही वेळातच त्याला कसेतरी वाटू लागले, तडफडत रुमबाहेर पडला. 

हिमांशु हितैषी हा तरुण इंदोरहून ग्वाल्हेरला प्रेयसीला भेटण्यासाठी आला होता. तिला घेऊन तो थाटीपूरच्या मयूर मार्केटमधील हॉटेल मॅक्सनमध्ये गेला. तिथे त्याने रुम बुक केली होती. रात्री ९ च्या सुमारास दिल्लीची रहिवासी असलेली तरुणी त्याला भेटण्यासाठी आली होती. जेव्हा ती रुममध्ये गेली तेव्हा हिमांशु दारू आणि सिगारेट पित होता. तिने त्याला रोखले होते. परंतू त्याने तिचे न ऐकता दारु पिणे सुरु ठेवले होते. 

मध्यरात्र होताच हिंमांशुने शक्तीवर्धक गोळी खाल्ली. यानंतर त्याची प्रकृती बिघडल्याचे या तरुणाने सांगितले. श्वास कोंडत असल्याने तो रुमबाहेर आला. त्याला बसताही येत नव्हते. जमिनीवर पडून तडफडू लागला. तिने घाबरून हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना बोलविले. ते त्याला हॉस्पिटलला घेऊन गेले, परंतू वाटेतच हिमांशुचा मृत्यू झाला. डॉक्टर देखील त्याच्या मृत्यूला हेच कारण असल्याचे सांगत आहेत. पोस्टमार्टेम रिपोर्ट आल्यानंतर कारण समजणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 

Web Title: Alcohol, energy sex pills and girlfriend...; gwalher youth rushed out of room no. 301, died shortly after

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.