Corona Vaccine: गुड न्यूज! भारताला लवकरच चौथी लस मिळणार; Pfizer ची प्रक्रिया अंतिम टप्प्यात 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 10:56 PM2021-06-22T22:56:33+5:302021-06-22T22:58:44+5:30

Corona Vaccine: भारतीयांसाठी दिलासादायक बाब म्हणजे भारताला चौथी लस मिळणार आहे.

albert bourla says pfizer final stages of getting approval for corona vaccine in India | Corona Vaccine: गुड न्यूज! भारताला लवकरच चौथी लस मिळणार; Pfizer ची प्रक्रिया अंतिम टप्प्यात 

Corona Vaccine: गुड न्यूज! भारताला लवकरच चौथी लस मिळणार; Pfizer ची प्रक्रिया अंतिम टप्प्यात 

googlenewsNext

नवी दिल्ली: देशात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. कोरोना नियंत्रणासाठी लसीकरण उत्तम उपाय असल्याने त्यावरच अधिकाधिक भर दिला जात आहे. भारतीयांसाठी दिलासादायक बाब म्हणजे भारताला चौथी लस मिळणार आहे. फायझरची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, भारतात लवकरच या लसीला मंजुरी मिळेल, अशी माहिती फायझर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बर्ट बोरला यांनी दिली आहे. (albert bourla says pfizer final stages of getting approval for corona vaccine in India)

सन २०२१ च्या सुरुवातील भारताने सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या लसींना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली. त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लसींचा तुटवडा निर्माण झाला. कोरोना लसीकरण मोहिमेला अधिक बळ देण्यासाठी केंद्राने रशियाच्या स्पुटनिक-व्ही लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली. आता त्यानंतर अमेरिकन कंपनी फायझरच्या लसीला भारतात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. फायझर कंपनीचे सीईओ अल्बर्ट बोरला यांनी यासंदर्भात माहिती दिली. 


लवकरच सरकारशी अंतिम करार

फायझर लसीला भारतात मंजुरी मिळण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. कंपनी लवकरच सरकारशी अंतिम करार करेल, अशी अपेक्षा आहे, असे बोरला यांनी म्हटले आहे. बायोफार्मा आणि हेल्थकेअरने आयोजित केलेल्या एका परिषदेत ते बोलत होते. यापूर्वी नीति आयोगाचे आरोग्य विषयक सदस्य डॉ. व्ही.के.पॉल यांनी यासंदर्भात सूतोवाच केले होते. भारतात आगामी काळात फायझर आणि मॉडर्ना लसीला मान्यता देण्याबाबत सरकार विचार करत असल्याचे ते म्हणाले होते. 

“दिव्याखाली अंधार, समजलं तर बरंय”; स्मृति इराणींची राहुल गांधींवर टीका

दरम्यान, भारतातील कोरोनाच्या परिस्थितीबद्दल आम्हाला मनापासून चिंता आहे आणि अशा परिस्थितीत आम्ही तुमच्या आणि तुमच्या प्रियजनांसोबत आणि सर्व भारतीय लोकांसह आहोत. भारताच्या कोरोनाविरुद्धच्या लढाईत भागीदार होण्याचा आमचा संकल्प आहे आणि आमच्या कंपनीच्या इतिहासामधील सर्वात मोठा दिलासा देण्यासाठी वेगाने कार्य करीत आहोत, अशा आशयाचे पत्र याआधी अल्बर्ट बोरला यांनी फायझर इंडियाच्या कर्मचार्‍यांना पाठवले होते. 
 

Web Title: albert bourla says pfizer final stages of getting approval for corona vaccine in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.