शहरं
Join us  
Trending Stories
1
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
2
मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर कुकी उग्रवाद्यांकडून भीषण हल्ला, दोन जवानांना वीरमरण   
3
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
4
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
5
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
6
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
7
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
8
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
9
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
10
उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला?
11
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
12
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
13
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
14
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
15
शिक्षण अकरावी, संपत्ती कोट्यवधी अन् डोक्यावर कर्ज; पाच वर्षात मिहिर कोटेचा बनले करोडपती
16
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 
17
राजेंद्र गावितांचा पत्ता कट? बविआ महायुतीत येणार; ‘लग्न आपल्या घरचे आहे’ अशी साद...
18
उद्धव ठाकरेंचे मत ‘हाता’ला, तर राज यांचे ‘धनुष्यबाणा’ला; लोकसभेला विचित्र योग
19
युद्धभूमीत मृत आईच्या पोटातून जिवंत बाळ! अख्खं कुटुंब हल्ल्यात ठार झालं

धोक्याची घंटा : युद्धासाठी चीन सैनिकांशिवाय होतोय सज्ज, आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे लष्करी हालचाली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2023 7:25 AM

Indian Vs China: २०२७ सालापर्यंत चीनचे लष्कर मानवरहित शस्त्रास्त्रे व आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर (एआय) आधारित यंत्रणेने सुसज्ज होणार आहेत.

बीजिंग : २०२७ सालापर्यंत चीनचे लष्कर मानवरहित शस्त्रास्त्रे व आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर (एआय) आधारित यंत्रणेने सुसज्ज होणार आहेत. जगातील इतर देशांशी इलेक्ट्रॉनिक, सायबर, अंतराळ, मानसशास्त्रीय अशा सर्व स्तरांवर लढता यावे, यासाठी चीनच्या लष्कराचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या (सीसीपी) केंद्रीय समितीच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. अमेरिका, युरोपातील देशांशी मुकाबला करायचा असेल तर त्यासाठी आपले लष्कर जागतिक दर्जाचे हवे, हे चीनने ओळखले आहे. त्यानुसार ही पावले उचलण्यात आली आहेत. चीनशी युद्ध करण्यासाठी अमेरिकेने सज्ज राहिले पाहिजे, असे अमेरिकेतील नेते मायकेल मॅककॉल यांनी म्हटले होते. (वृत्तसंस्था)

सायबर युद्धासाठी जोरदार तयारीn चीनच्या लष्कराचे आधुनिकीकरण करताना स्मार्ट टेक्नाॅलॉजी व अद्ययावत यंत्रसामग्रीचा वापर करण्यावर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी भर दिला आहे. यासंदर्भात चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने ठरविलेल्या धोरणाची वेगाने अंमलबजावणी करण्याचे त्यांनी ठरविले आहे. n चीनच्या लष्कराला अधिक बळकट करण्यासाठी गुप्तहेर यंत्रणा, संगणकीकरण आदी गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यात सायबर युद्धासाठी चिनी सैन्याला तयार करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेचाही समावेश आहे.

मानवरहित यंत्रणेद्वारे डागली जाणार क्षेपणास्त्रेसैन्यामध्ये रोबोटिक तसेच मानवरहित यंत्रणांवर चालणारी अत्याधुनिक क्षेपणास्त्र यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल. लष्कराला रसद पुरवठा करण्याकरिता मानवरहित वाहने, नौदलासाठी मानवरहित जहाजे, पाणबुड्या यांचा वापर करण्यावर भर देण्याचा विचार आहे. हवाई दलासाठीदेखील मानवरहित यंत्रणा विकसित करत आहे.

खासगी कंपन्यांना मोठी सबसिडीआर्टिफिशियल इंटेलिजन्स व अन्य महत्वाच्या तंत्रज्ञानाचा विकास करण्यासाठी चीन खासगी क्षेत्रातील कंपन्यांना प्रोत्साहन देत आहे. हे काम करणाऱ्या शी जिनपिंग सरकारने मोठी सबसिडी देऊ केली आहे. शी जिनपिंग सर्वात अप्रिय नेताजगात शी जिनपिंग हे सर्वात अप्रिय नेता आहेत, असे अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी सांगितले. जिनपिंग यांच्याविषयी वाईट मतेच ऐकायला मिळाली, असे पॉम्पिओ यांनी पुस्तकात म्हटले आहे. 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावchinaचीन