“भारत जोडो न्याय यात्रा काँग्रेसची, आम्हाला अपेक्षा आहे की...”; अखिलेश यादव यांची मोठी अट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 10:53 AM2024-01-08T10:53:27+5:302024-01-08T10:54:03+5:30

Akhilesh Yadav On Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra: राहुल गांधींची ही यात्रा होत आहे, ही चांगली गोष्ट आहे, असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.

akhilesh yadav reaction over congress rahul gandhi bharat jodo yatra | “भारत जोडो न्याय यात्रा काँग्रेसची, आम्हाला अपेक्षा आहे की...”; अखिलेश यादव यांची मोठी अट

“भारत जोडो न्याय यात्रा काँग्रेसची, आम्हाला अपेक्षा आहे की...”; अखिलेश यादव यांची मोठी अट

Akhilesh Yadav On Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra: राहुल गांधी यांच्या १४ जानेवारीपासून सुरू होणार असलेल्या यात्रेचे नाव बदलून ‘भारत जोडो न्याय यात्रा’ असे करण्यात आले आहे. पूर्वी या यात्रेला ‘भारत न्याय यात्रा’ असे नाव देण्यात आले होते. यावरून आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहे. या यात्रेपूर्वीच विरोधकांच्या इंडिया आघाडीत बिघाडी होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी काँग्रेससमोर एक मोठी अट ठेवली आहे. 

मणिपूरमधून भारत जोडो न्याय यात्रा सुरू होणार आहे. तब्बल ६,७०० किमी लांब अशी ही पदयात्रा देशातील १५ राज्यांमधून जाईल. काँग्रेसने सर्व मित्रपक्षांना या यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या यात्रेत उत्तर प्रदेशमधील काँग्रेसचा मित्रपक्ष आणि इंडिया आघाडीमधील सदस्य समाजवादी पार्टी सहभागी होणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. जागावाटपावरून सपा आणि काँग्रेसमध्ये काही कुरबुरी सुरू असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. यासंदर्भात अखिलेश यादव यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. 

...तर खूप भक्कमपणे सगळे लढू शकतील

सध्या तरी ही यात्रा केवळ काँग्रेसची आहे. आम्हाला अपेक्षा आहे की इंडिया आघाडीत जितके विरोधी पक्ष आहेत, जसे की पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार तसेच लालू प्रसाद यादव आणि इतर सगळेच पक्ष जे काँग्रेसशी युती करून भाजपाविरोधात लढणार आहेत, त्यांची अशी इच्छा आहे की, या यात्रेपूर्वी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटप पूर्ण व्हावे. आधी जागावाटप, त्यानंतर यात्रा आणि मग निवडणूक असा क्रम असेल तर खूप भक्कमपणे सगळेचजण लढू शकतील, असे मत अखिलेश यादव यांनी व्यक्त केले. 

दरम्यान, राहुल गांधींची ही यात्रा होत आहे, ही चांगली गोष्ट आहे. परंतु, सगळ्या पक्षांना असे वाटते की या यात्रेआधी जागावाटप झाले पाहिजे. जागावाटप झाले तर यात्रेत अनेक लोक स्वतःहून मदतीसाठी येतील. निवडणूक लढणार आहे, तो प्रत्येक उमेदवार जगबाबदारीने तिथे उभा असेल, यात्रेत सहभागी होईल, असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.

 

Web Title: akhilesh yadav reaction over congress rahul gandhi bharat jodo yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.