अखिलेश यादव यांनी काँग्रेसची केली काेंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2023 06:18 IST2023-11-25T06:18:35+5:302023-11-25T06:18:53+5:30

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा उमेदवारांसंदर्भात अखिलेश यादव यांनी बैठक बोलावली आहे.

Akhilesh Yadav made the Congress party | अखिलेश यादव यांनी काँग्रेसची केली काेंडी

अखिलेश यादव यांनी काँग्रेसची केली काेंडी

आदेश रावल
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीपासून सुरू झालेला काँग्रेस आणि समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यातील वाद वाढतच चालला आहे. आता अखिलेश यादव काँग्रेसला धडा शिकविण्याची तयारी करीत आहेत.

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा उमेदवारांसंदर्भात अखिलेश यादव यांनी बैठक बोलावली आहे. इंडिया आघाडीतील सहभागी पक्ष मिळून निवडणूक लढवणार आहेत, असे यापूर्वी निश्चित झाले होते. सर्व पक्षांमध्ये जागावाटप करण्यात येईल, असे ठरले होते. काँग्रेसने मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत सपाला जागा देण्यास नकार दिला होता, तेव्हापासून दोन्ही पक्षांमधील अंतर वाढत आहे. 
 

Web Title: Akhilesh Yadav made the Congress party