शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणात प्रोटेम स्पीकरपदी अकबरुद्दीन ओवैसी; भाजपा आमदारांचा शपथविधीस नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2023 13:56 IST

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अकबरुद्दीन ओवैसींचा प्रोटेम स्पीकर म्हणून शपथविधीही झाला.

तेलंगणात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवलं असून बीआरएसला सत्तेतून पायउतार व्हावे लागलं. तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसच्या रेवंथ रेड्डी यांनी शपथ घेतली असून काँग्रेसचं सरकार स्पष्ट बहुमताने स्थापन झालं आहे. येथील निवडणुकीत एमआयएमनेही ८ जागांवर विजय मिळवला असून एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी हेही पुन्हा एकदा आमदार बनले आहेत. त्यातच, अकबरुद्दीन ओवैसी यांनी आज प्रोटेम स्पीकर म्हणून शपथ घेतली. मात्र, भाजपने त्यांच्या या शपथविधीला विरोध केला आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अकबरुद्दीन ओवैसींचा प्रोटेम स्पीकर म्हणून शपथविधीही झाला. मात्र, त्यास भाजपने विरोध केला आहे, भाजपा नेते आणि केंद्रीयमंत्री जी. किशन रेड्डी यांनी अकबरुद्दीन ओवैसींना प्रोटेम स्पीकर बनवण्यास भाजपाचा विरोध असल्याचे म्हटले. तसेच, अनेक वरिष्ठ आमदार असताना, त्यांना बाजुला ठेऊन अकबरुद्दीन ओवैसींना प्रोटेम स्पीकर नियुक्त करणे चुकीचं असल्याचंही त्यांनी म्हटलं. 

सध्या तेलंगणातील निवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सुरू आहे. काँग्रेससह इतरही पक्षाच्या आमदारांकडून पद व गोपनियतेची शपथ घेतली जात आहे. मात्र, भाजपाच्या आमदारांनी शपथ घेण्यास नकार दिला आहे. नियमित स्पीकर/ विधानसभा अध्यक्ष आल्यानंतरच आम्ही शपथ घेणार असल्याची भूमिका भाजपा आमदारांनी जाहीर केली आहे. तसेच, राज्यपालांकडून जाऊन अकबरुद्दीन ओवैसींच्या प्रोटेम स्पीकरपदाला विरोध असल्याचे पत्र देणार आहोत, असेही भाजपने स्पष्ट केले आहे.  काँग्रेसने एमआयएमचे सहकार्य मिळवण्यासाठी अकबरुद्दीन ओवैसींना प्रोटेम स्पीकर नियुक्त केले आहे. मात्र, वरिष्ठ व अनुभवी नेत्यांना प्रोटेम स्पीकर बनवण्याची परंपरा आहे, असेही रेड्डी यांनी म्हटले.

दरम्यान, तेलंगणातील विधानसभा निवडणुकीत भाजपचे ८ आमदार निवडून आले आहेत. गत निवडणुकीत भाजपाचा तेलंगणात केवळ १ आमदार निवडून आला होता.  

टॅग्स :Telanganaतेलंगणाvidhan sabhaविधानसभाcongressकाँग्रेसBJPभाजपाAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनMLAआमदार