अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 06:41 IST2025-07-17T06:41:10+5:302025-07-17T06:41:21+5:30
बदल कोणते? : पुस्तकात दिल्ली सल्तनत व मुघल काळातील धार्मिक असहिष्णुतेची उदाहरणे दिली आहेत. बाबरला क्रूर राजा, तर अकबराचे सहिष्णुता आणि क्रूरतेचे मिश्रण असे वर्णन केले आहे. औरंगजेबाला मंदिरे व गुरुद्वारांचा विध्वंसक, असे म्हटले आहे.

अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : एनसीईआरटी बोर्डाने इयत्ता ८ वीच्या पुस्तकात मोठे बदल केले आहेत. सामाजिक शास्त्राच्या पुस्तकात मुघल इतिहास नवीन दृष्टिकोनातून मांडण्यात आला आहे. यात सम्राट अकबरला ‘निर्दयी पण सहिष्णू’ आणि औरंगजेबला ‘कठोर धार्मिक शासक’ म्हणून चित्रित केले आहे. या पुस्तकात १३ व्या ते १७ व्या शतकातील राजकीय चळवळींचा समावेश आहे.
बदल कोणते? : पुस्तकात दिल्ली सल्तनत व मुघल काळातील धार्मिक असहिष्णुतेची उदाहरणे दिली आहेत. बाबरला क्रूर राजा, तर अकबराचे सहिष्णुता आणि क्रूरतेचे मिश्रण असे वर्णन केले आहे. औरंगजेबाला मंदिरे व गुरुद्वारांचा विध्वंसक, असे म्हटले आहे.
पुस्तकात बदल का केले?
पुस्तकांमध्ये बदल झाल्यानंतर वाद निर्माण होऊ शकतो. हे टाळण्यासाठी एनसीईआरटीने म्हटले आहे की, 'भूतकाळातील घटनांसाठी आज कोणालाही दोषी ठरवू नये.'
गेल्या वर्षीही केले बदल
एनसीईआरटीने गेल्या वर्षी पुस्तकांमध्ये काही बदल केले होते. अभ्यासक्रमात 'राष्ट्रीय युद्ध स्मारक' समाविष्ट केले होते. यासोबतच शालेय पुस्तकांमध्ये वीर अब्दुल हमीद यांच्यावरील एक प्रकरण समाविष्ट केले होते.