मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती विमानतळाजवळ झालेला विमान अपघात हा अपघात नसून तो एक सुनियोजित कटाद्वारे केलेला घातपात असल्याचा खळबळजनक संशय अजित पवार यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सविस्तर सादरीकरण करत या अपघाताबाबत अनेक प्रश्न आणि शंका उपस्थित केल्या.
या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी त्यांनी विमान भाड्याने देणाऱ्या व्हीएसआर कंपनीसह संपूर्ण प्रकरणाची तांत्रिक तज्ज्ञांमार्फत आणि विशेषतः फ्रान्स, अमेरिका किंवा युकेमधील तज्ज्ञ एजन्सींकडून चौकशी करण्याची मागणी केली आहे.
रोहित पवारांचे प्रश्न
दृश्यमानतेबाबत मुद्दाम खोटी माहिती का दिली? पायलटने हे मुद्दाम केले का? की कुणाच्या सांगण्यावरून केले?अपघाताच्या एक मिनिट आधी विमानातील ट्रान्सपॅान्डर बंद का करण्यात आला होता?बारामती एटीसीने विमान २९ नंबरच्या धावपट्टीवर उतरण्याची दोनदा सूचना केली होती. मात्र टेकडीकडील अवघड असलेल्या ११ नंबरच्या धावपट्टीवर उतरण्याचा आग्रह पायलटने का धरला होता? पायलटला विमान क्रॅशच करायचे होते का?
शरद पवार यांनी अजित पवार यांच्या अपघातानंतर सात तासांनी आपले मत व्यक्त केले. त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. तर मी आज अपघातानंतर १३ दिवसांनी बोलत आहे. याबाबतची सर्व माहिती संकलित करून, मी बोलत आहे. याबाबतीत मात्र शरद पवार यांच्याशी काही चर्चा झाली नाही - रोहित पवार, आमदार
शरद पवार म्हणाले होते... निव्वळ अपघात, यात राजकारण नाहीअजित पवार यांच्या अपघाताच्या दिवशी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले होते की, या अपघातामागे काही राजकारण आहे, अशा प्रकारची भूमिका कोलकात्यावरून मांडली गेली, असं कळलं. पण, ह्यात राजकारण नाही. हा निव्वळ अपघात आहे. त्यानंतर आता रोहित पवार यांनी वेगळी भूमिका मांडली.
Web Summary : Rohit Pawar suspects Ajit Pawar's plane accident near Baramati was a planned attack. He demands investigation by foreign agencies, citing suspicious pilot behavior and transponder issues before the crash. Sharad Pawar initially called it an accident.
Web Summary : रोहित पवार को संदेह है कि बारामती के पास अजित पवार का विमान हादसा एक सुनियोजित हमला था। उन्होंने विदेशी एजेंसियों द्वारा जांच की मांग की, दुर्घटना से पहले संदिग्ध पायलट व्यवहार और ट्रांसपोंडर मुद्दों का हवाला दिया। शरद पवार ने शुरू में इसे एक दुर्घटना बताया था।