शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांचा मृतदेह 'असामान्य' सुजला होता! रोहित पवारांचा दिल्लीतून खळबळजनक खुलासा; मृत्यूचं गूढ वाढलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 16:32 IST

Rohit Pawar in Delhi : रोहित पवार यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत अजित पवारांच्या अपघाताबाबत नवा खुलासा केला आहे. मृतदेह असामान्यपणे सुजलेला असल्याचा डॉक्टरांचा दावा त्यांनी समोर आणला. वाचा सविस्तर.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडालेली असतानाच, आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावर मोठे खुलासे करण्यास सुरुवात केली आहे. "अजित दादांचा मृतदेह असामान्यपणे खूप जास्त सुजलेला होता," असा धक्कादायक खुलासा रोहित पवार यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत केला आहे. 

रोहित पवारांनी व्हीएसआर विमान कंपनी आणि डीजीसीएसह विमानाचा वादग्रस्त पायलट यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मंगळवारी त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आज त्यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत नवा खुलासा केला आहे.  

भाजल्यानंतर शरीर इतकं सुजतं का?मुंबईतील पत्रकार परिषदेत ही बाब टाळली होती, असे सांगत रोहित पवारांनी दिल्लीत डॉक्टरांसोबत झालेल्या चर्चेचा दाखला दिला. ते म्हणाले, "मी जेव्हा डॉक्टरांना विचारलं की, शरीर भाजल्यानंतर इतकं सुजतं का? तेव्हा त्यांनी हो असं उत्तर दिलं. मात्र, दादांची बॉडी ही सामान्यापेक्षा खूप जास्त सुजलेली होती, असे डॉक्टर म्हणाले होते. ती इतकी का सुजली होती, याचं कारण शोधणं आता महत्त्वाचं आहे."

सोशल मीडियावरील 'त्या' फोटोंवर शिक्कामोर्तब?विमान अपघातानंतर सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते, ज्यामध्ये मृतदेह ओळखता येत नव्हता आणि तो मोठ्या प्रमाणात फुगल्याचा दावा केला जात होता. रोहित पवारांच्या आजच्या खुलाशामुळे त्या फोटोंबाबत आणि एकूणच अपघाताच्या तीव्रतेबाबत आता नवीन प्रश्न उपस्थित होत आहेत.

अपघातामागे काही वेगळं कारण?रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या या संशयामुळे आता तपासाची दिशा बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केवळ विमान अपघात की त्यामागे आणखी काही 'असामान्य' घडले होते, याबाबत आता राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar's body unusually swollen: Rohit Pawar reveals mystery deepens.

Web Summary : Rohit Pawar's revelation about Ajit Pawar's swollen body after a plane crash raises suspicion. He questioned the extent of swelling with doctors, fueling doubts about the accident's cause and intensity. Investigation may take a new direction.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारRohit Pawarरोहित पवारPlane Crashविमान दुर्घटनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसBaramatiबारामती