अजब योगायोग... ४५ वर्षांच्या विवाहानंतर एकाच दिवशी झाला पती-पत्नीचा मृत्यू!

By Admin | Updated: March 17, 2016 09:54 IST2016-03-17T09:53:44+5:302016-03-17T09:54:04+5:30

सुमारे ४५ वर्ष एकमेकांशी विवाहबद्ध असलेल्या जोडप्याला मृत्यूही दूर करू शकला नाही, पतीवर निरातिशय प्रेम असलेल्या पत्नीने पतीच्या निधनानंतर अवघ्या काही काळातच प्राण सोडले.

Ajab coincidence ... husband and wife died on the same day after 45 years of marriage! | अजब योगायोग... ४५ वर्षांच्या विवाहानंतर एकाच दिवशी झाला पती-पत्नीचा मृत्यू!

अजब योगायोग... ४५ वर्षांच्या विवाहानंतर एकाच दिवशी झाला पती-पत्नीचा मृत्यू!

>ऑनलाइन लोकमत
म्हैसूर, दि. १७ - खरं प्रेम असेल तर मृत्यूही तुम्हाला एकमेकांपासून दूर करू शकत नाही असं म्हणतात, पण कर्नाटकमध्ये मात्र हीच उक्ती प्रत्यक्षात आल्याची घटना घडली. सुमारे ४५ वर्ष एकमेकांशी विवाहबद्ध असलेल्या जोडप्याला मृत्यूही दूर करू शकला नाही, पतीवर निरातिशय प्रेम असलेल्या पत्नीने पतीच्या निधनानंतर अवघ्या काही काळातच प्राण सोडले. कर्नाटकच्या मालवली तालुक्यातील दोडाभुवल्ली गावात गेल्या आठवड्यात ही दुर्दैवी घटना घडली. 
परशिवमुर्थी आणि जयम्मा असे त्या जोडप्याचे नाव असून ते दोडाभुवल्ली गावचे रहिवासी होते. ६५ वर्षीय परशिवमुर्थी यांचा शनिवारी आजारपणामुळे मृत्यू झाला, मात्र त्यांच्या मृत्यूमुळे शोकाकुल झालेल्या जयाम्मांना सावरणे अतिशय कठीण होते. पतीता मृतदेह पाहून जयम्मा खाली कोसळल्या आणि काही वेळातच त्यांचाही मृत्यू झाला. परशिवमुर्थी आणि जयम्मा यांच्या पश्चात दोन मुले आहेत.
एकमेकांवर अतिशय प्रेम करणा-या आणि एकत्रच मृत्यूला कवटाळणा-या या प्रेमळ जोडप्याला अंतिम निरोप देण्यासाठी शेकडो नागरिक गावात जमले होते. 
 

Web Title: Ajab coincidence ... husband and wife died on the same day after 45 years of marriage!