एआयचा ‘भारत’ निर्माता, आजपासून परिषद सुरू; ४५ हून अधिक देशांचे शिष्टमंडळ सहभागी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 08:15 IST2026-02-16T08:14:12+5:302026-02-16T08:15:04+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून या पाच दिवसीय (१६ ते २० फेब्रुवारी) परिषदेत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन व ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्वा यांच्यासह ४५ हून अधिक देशांचे मंत्रिस्तरीय शिष्टमंडळ सहभागी होणार आहे.

AI's 'India' creator, conference starts today; Delegations from more than 45 countries will participate | एआयचा ‘भारत’ निर्माता, आजपासून परिषद सुरू; ४५ हून अधिक देशांचे शिष्टमंडळ सहभागी होणार

एआयचा ‘भारत’ निर्माता, आजपासून परिषद सुरू; ४५ हून अधिक देशांचे शिष्टमंडळ सहभागी होणार

नवी दिल्ली : विद्युत शक्तीच्या शोधानंतर मानवी जीवनात सर्वांत मोठा बदल घडविण्याची क्षमता असलेल्या ‘एआय’बाबत जागतिक दिशा ठरविण्यासाठी भारत सज्ज झाला आहे. १६ फेब्रुवारीपासून नवी दिल्लीतील भव्य ‘भारत मंडपम’ येथे ‘एआय इम्पॅक्ट समिट’ या उच्चस्तरीय जागतिक शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या माध्यमातून भारत एआय युगाचे नियम आणि मानक ठरवणारा मुख्य निर्माता म्हणून समोर येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून या पाच दिवसीय (१६ ते २० फेब्रुवारी) परिषदेत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन व ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्वा यांच्यासह ४५ हून अधिक देशांचे मंत्रिस्तरीय शिष्टमंडळ सहभागी होणार आहे.

उद्योगजगताचे दिग्गज एकत्र

एआय क्षेत्रातील दिग्गज आणि जागतिक कंपन्यांचे प्रमुख या परिषदेचे आकर्षण असतील. यामध्ये गुगलचे सुंदर पिचाई, ओपन एआयचे सॅम ऑल्टमॅन, गुगल डीपमाईंडचे डेमिस हसाबिस, मायक्रोसॉफ्टचे ब्रॅड स्मिथ यांसारखे दिग्गज तंत्रज्ञ भविष्यातील एआयच्या संधी आणि आव्हानांवर चर्चा करतील.

पुतीन यांचे खास दूत रशियाचे नेतृत्व करणार

या परिषदेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे वरिष्ठ आर्थिक सल्लागार आणि क्रेमलिनचे उपप्रमुख मॅक्सिम ओरेश्किन हे एका मोठ्या रशियन शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार आहेत. ओरेश्किन यांची निवड ही भारत-रशियादरम्यान एआयमधील  सहकार्य वाढविण्याच्या रणनीतीचा भाग आहे.

Web Title : भारत में एआई शिखर सम्मेलन; वैश्विक नेताओं की भागीदारी।

Web Summary : भारत नई दिल्ली में 'एआई इम्पैक्ट समिट' में एआई के भविष्य को आकार देने के लिए तैयार है। फ्रांस और ब्राजील सहित 45 से अधिक देशों के नेता, गूगल और माइक्रोसॉफ्ट जैसे तकनीकी दिग्गजों के साथ, एआई के अवसरों और चुनौतियों पर चर्चा करेंगे। रूसी प्रतिनिधिमंडल का नेतृत्व पुतिन के सलाहकार करेंगे।

Web Title : India to host AI summit; global leaders to participate.

Web Summary : India is set to shape the future of AI at the 'AI Impact Summit' in New Delhi. Leaders from over 45 countries, including France and Brazil, alongside tech giants like Google and Microsoft, will discuss AI's opportunities and challenges. Russia's delegation will be led by Putin's advisor.