शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 16:29 IST

अहमदाबादमधील विमान अपघातानंतर, केंद्र सरकार बोईंग ड्रीमलायनर 787-8 ची उड्डाणे थांबवण्याचा विचार करत आहे.

गुजरातमधील अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचाअपघात झाला. या अपघातामध्ये २६५ लोकांचा मृत्यू झाला. यामधील २४१ जण विमानातून प्रवास करत होते, अपघात झालेले हे विमान 'बोईंग ड्रीमलायनर 787-8' हे विमान होते. आता या विमानांबाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. 

'बोईंग ड्रीमलायनर 787-8' या विमानांची उड्डाणे थांबवण्याबाबत भारतीय आणि अमेरिकी एजन्सी या चर्चा करत आहेत. एअर इंडियावरही कारवाई होण्याची शक्यता आहे.

वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला

एअर इंडियाच्या विमानांच्या देखभाल आणि त्याच्या ऑपरेशन प्रक्रियेची देखील चौकशी होऊ शकते.

'एअर इंडिया'वर प्रश्न उपस्थित

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे माजी संयुक्त सचिव सनत कौल म्हणाले की, डीजीसीएने एअर इंडियाला अनेक वेळा पत्र लिहून सुरक्षा तपासणीसह इतर त्रुटींबद्दल सूचना दिल्या आहेत. या अपघातानंतर, एअर इंडियावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

याआधीही बोईंग 787 ची उड्डाणे थांबवली होती

बोईंग 787 वर बंदी आणण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही याबाबत चर्चा झाल्या आहेत.२०१३ च्या सुरुवातीला बोईंग 787 च्या लिथियम-आयन बॅटरीला आग लागली होती, त्यानंतर जगभरात या ताफ्यावर ३ महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली होती. दरम्यान, आता काल झालेल्या अपघातामध्ये जर विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड सापडला तर बोईंग 787-8 च्या उड्डाणांवर 2-3 महिने किंवा त्याहून अधिक काळ बंदी घातली जाऊ शकते.

टाटा समुहाने मदत जाहीर केली

एअर इंडियाच्या विमानाच्या  अपघातात जीव गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबाला १ कोटी रुपये भरपाई दिली जाईल. म्हणजे विमानात प्रवास करत असलेल्या २४२ लोकांशिवाय अन्य २४ लोकांच्या कुटुंबियांनाही ही मदत दिली जाणार आहे, असं टाटा समुहाने स्पष्टीकरण दिले आहे. यामध्ये किमान पाच एमबीबीएस विद्यार्थी, एक पीजी निवासी डॉक्टर आणि एका सुपरस्पेशालिस्ट डॉक्टरच्या पत्नीचा समावेश आहे.

जखमींच्या उपचाराचा खर्चही टाटा समुह देणार

अपघातात जखमी झालेल्या सर्व लोकांच्या उपचारांचा खर्च उचलण्यासोबतच त्यांना पूर्ण मदत आणि आवश्यक काळजी मिळेल याची खात्री टाटा ग्रुपने केली आहे. बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाच्या इमारतीच्या पुनर्बांधणीसाठीही आम्ही मदत करू, असंही टाटा समुहाने सांगितले आहे. 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाairplaneविमानGujaratगुजरातAccidentअपघात