Aircel-Maxis case: Chidambaram not cooperating, custodial interrogation necessary, ED says in court | Aircel-Maxis case: पी. चिदंबरम यांच्या जामिनाला EDचा विरोध
Aircel-Maxis case: पी. चिदंबरम यांच्या जामिनाला EDचा विरोध

नवी दिल्ली : एअरसेल-मॅक्सिस प्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या अंतिम जामीन याचिकेला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) विरोध केला आहे. 

सक्तवसुली संचालनालयाने बुधवारी न्यायालयात आपले म्हणणे मांडले. यावेळी सक्तवसुली संचालनालयाने सांगितले की, पी. चिदंबरम यांना जामीन दिल्यास एअरसेल-मॅक्सिस प्रकरणात अडथळे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्याची गरज आहे. 


दरम्यान, एअरसेल-मॅक्सिसप्रकरणी पी.चिदंबरम यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. याबाबत विशेष न्यायाधीश ओ. पी. सैनी यांनी आरोपपत्रावर सुनावणी करण्यासाठी 26 नोव्हेंबरची तारीख निश्चित केली आहे. याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने सुरुवातीला पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते.  तसेच, याप्रकरणात नऊ आरोपींच्या नावांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये चिदंबरम, एस. भास्कररन (कार्ती यांचे सीए), व्ही. श्रीनिवासन (एअरसेलचे माजी सीईओ) यांच्याही नावांचा समावेश आहे. 

English summary :
Aircel-Maxis case: Chargesheet filed against P Chidambaram for Aircel-Maxis case. Special Judge O P. Saini has fixed hiring date on the case at November 26. Former finance minister p. Chidambaram's final bail application has been opposed by the ED.


Web Title: Aircel-Maxis case: Chidambaram not cooperating, custodial interrogation necessary, ED says in court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.