Aircel-Maxis case: Chargesheet against Karti Chidambaram | Aircel-Maxis case: कार्ती चिदंबरम यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल
Aircel-Maxis case: कार्ती चिदंबरम यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली : माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) एअरसेल-मॅक्सिस घोटाळ्याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात पी. चिदंबरम यांचा सुद्धा उल्लेख करण्यात आला आहे. 

कार्ती चिदंबरम यांच्यावर एअरसेल-मॅक्सिस करारात नियमांचं कथित उल्लंघन आणि घोटाळा केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी 1 कोटी 16 लाख 9380 रुपये जप्त केल्याचे सक्तवसुली संचालनालयाने आरोपपत्रात म्हटले आहे. यातील 26 लाख 444 रुपये मुदत ठेवी स्वरुपात आहेत. कार्ती चिदंबरम यांचे एक खाते सील करण्यात आले आहे. त्यामध्ये 90 लाख रुपये आहेत. याशिवाय त्यांचे अजून एक खाते सक्तवसुली संचालनायाच्या ताब्यात आहे. त्यामध्ये 8936 रुपये जमा आहेत.  

याशिवाय कार्ती चिदंबरम यांच्यावर आयएनएक्स मीडिया प्रकरणी 10 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. दरम्यान, एअरसेल-मॅक्सिस करार आणि मनी लॉन्डिंग प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची दोनवेळा चौकशी केली आहे. याप्रकरणी पी. चिदंबरम यांनी ब-याच वेळा म्हटले आहे की, आम्ही कोणतेही काम चुकीचे केलेले नाही.

Web Title: Aircel-Maxis case: Chargesheet against Karti Chidambaram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.