पाच महिन्यांत हवाई वाहतूक 3 टक्के वाढली

By Admin | Updated: June 20, 2014 23:40 IST2014-06-20T23:40:16+5:302014-06-20T23:40:16+5:30

जानेवारी ते मे या पाच महिन्यांच्या काळात भारतातील देशांतर्गत हवाई वाहतूक गेल्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत 3 टक्क्यांनी वाढली.

Air traffic in 3 months has increased by 3 percent | पाच महिन्यांत हवाई वाहतूक 3 टक्के वाढली

पाच महिन्यांत हवाई वाहतूक 3 टक्के वाढली

>नवी दिल्ली : जानेवारी ते मे या पाच महिन्यांच्या काळात भारतातील देशांतर्गत हवाई वाहतूक गेल्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत 3 टक्क्यांनी वाढली. गेल्या महिन्यात इंडिगोचा बाजार हिस्सा सर्वाधिक 32 टक्के होता. 
सर्व भारतीय विमान कंपन्यांच्या विमानांमधून एकटय़ा मे महिन्यात एकूण 6क्.22 लाख प्रवशांनी प्रवास केला. एप्रिलमध्ये ही संख्या 57.1क् लाख होती. जानेवारी ते मे या संपूर्ण 5 महिन्यांच्या काळात 267.22 लाख प्रवाशांनी हवाई सफर केली. गेल्या वर्षी याच काळात 26क् लाख प्रवाशांनी प्रवास केला होता. याचाच अर्थ एकूण 2.78 टक्क्यांनी वाढ नोंदली गेली आहे. 
देशांतर्गत वाहतूक करणा:या विमान कंपन्यांच्या हिस्सेदारीत इंडिगो आपला दबदबा राखून आहे. मे महिन्यात इंडिगोचा एकूण हवाई वाहतुकीतील वाटा 31.7 टक्के होता. जेट एअरवेज-जेटलाईट यांचा एकत्रित हिस्सा 21 टक्के होता. एअर इंडिया 18.6 टक्के हिश्श्यासह तिस:या स्थानावर आहे. स्पाईसजेटचा बाजार हिस्सा 17.9 टक्के, तर गोएअरचा बाजार हिस्सा 9.8 टक्के आहे. 
सीट फॅक्टरच्या डेटानुसार, एअर इंडियाने जेट एअरवेजला मागे टाकले. इंडिगो, गोएअर आणि स्पाईसजेट या कंपन्यांना एअर इंडियाने जवळपास गाठले आहे. 
सीट फॅक्टरलाच पॅसेंजर लोड फॅक्टर (पीएलएफ) अशी संज्ञाही विमान वाहतूक क्षेत्रत वापरली जाते. विमानातील उपलब्ध जागांपैकी किती जागांवर प्रवाशी घेऊन विमान उड्डाण करते, यावरून सीट फॅक्टर ठरतो. 
इंडिगो, गोएअर, स्पाईसजेट आणि जेटलाईट यांचे पीएलएफचे प्रमाण अनुक्रमे 82 टक्के, 81.8 टक्के, 81.3 टक्क्के आणि 8क् टक्के होते. एअर इंडियाचा पीएलएफ 79.5 टक्के तर जेट एअरवेजचा 75.2 टक्के होता. 
उच्चस्तरीय सूत्रंनी सांगितले की, विमान वाहतुकीच्या क्षेत्रत वृद्धी दिसून येण्याचा दुसरा अर्थ मंदीचा प्रभाव कमी होत आहे, असा लावला जातो. 2क्14 चा पूर्वार्ध विमान कंपन्यांसाठी चांगला राहिला आहे. आगामी 6 महिन्यांचा काळही चांगला राहील, असे जाणकारांना वाटते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 

Web Title: Air traffic in 3 months has increased by 3 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.