एअर इंडियाने ४८ वैमानिक काढले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2020 03:03 IST2020-08-16T03:02:20+5:302020-08-16T03:03:08+5:30
एअर इंडियानं स्वातंत्र्यदिनाच्या अगोदरच्या दिवशीच आपल्या ४८ वैमानिकांना सेवेतून कमी केले आहे.

एअर इंडियाने ४८ वैमानिक काढले
नवी दिल्ली : कोरोना काळात एअरलाईन्सला मोठं नुकसान सहन करावं लागले आहे. त्यामुळे एअर इंडियानं स्वातंत्र्यदिनाच्या अगोदरच्या दिवशीच आपल्या ४८ वैमानिकांना सेवेतून कमी केले आहे. या वैमानिकांनी गेल्यावर्षी आपला राजीनामा कंपनीकडे सोपवला होता. परंतु, नियमानुसार सहा महिन्यांच्या नोटिशीच्या आत त्यांनी आपले राजीनामे परत घेतले होते. एअर इंडियाने या वैमानिकांना राजीनामा परत घेण्यास स्वीकृती दर्शवली होती. परंतु, गुरुवारी अचानक ही स्वीकृती रद्द करण्यात आली.