हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 09:23 IST2025-07-27T09:23:22+5:302025-07-27T09:23:51+5:30
Air India Plane Crash: एन चंद्रशेखर यांच्यासोबत ही बैठक झाली आहे. केंद्रीय विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू, सचिव समीर कुमार सिन्हा आणि डीजीसीए प्रमुख फैज अहमद किडवाई यांनी शुक्रवारी ही बैठक घेतली.

हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडिया कंपनीतील गैरकारभार समोर येऊ लागला आहे. टाटा सन्स आणि एअर इंडियाच्या अध्यक्षांसोबत झालेल्या बैठकीत केंद्र सरकारने कठोर शब्दांत सुनावले आहे. यामध्ये ज्यांना पदावर बसविले आहे त्यांनाच निर्णय घेऊ द्या, पाठीमागून निर्णय घेऊ नका असा मोठा संदेश दिला आहे.
एन चंद्रशेखर यांच्यासोबत ही बैठक झाली आहे. केंद्रीय विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू, सचिव समीर कुमार सिन्हा आणि डीजीसीए प्रमुख फैज अहमद किडवाई यांनी शुक्रवारी ही बैठक घेतली. या बैठकीत सुरक्षा सुधारण्याच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली, ज्यावर चंद्रशेखरन यांनी सहमती दर्शवली आहे.
एअर इंडियाच्या प्रमुख विभागांमध्ये सुरक्षिततेवर थेट परिणाम करणारी मागील सीटवरून गाडी चालवण्याची संस्कृती तात्काळ बंद केली पाहिजे, अशा शब्दांत सरकारने चंद्रशेखर यांना समज दिली आहे. तसेच महत्त्वाच्या विभागांमधील लोकांना निर्णय घेण्याचा अधिकार असला पाहिजे, काही घडल्यास गोष्टी चुकीच्या झाल्यास त्यांना दोषी ठरवले जाऊ नये. बऱ्याच प्रकरणांमध्ये कोणीतरी दुसराच त्या पदावरील अधिकाऱ्यांचे निर्णय घेत असतो. ही व्यवस्था अत्यंत चुकीची आणि धोकादायक आहे. ती तातडीने बंद करायला हवी, असे सरकारने सुनावले आहे.
एअर इंडियाच्या गुरुग्राम कार्यालयात अपघातग्रस्त विमानांचे सामान ठेवले जात होते. या कार्यालयात सीट, उपकरणे आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डर प्रदर्शनात ठेवण्यात आले आहेत. जरी त्याचा उद्देश सुरक्षिततेची गरज लक्षात आणून देणे असला तरी, मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना ते आवडत नाही, असेही एअर इंडियाला सांगण्यात आले आहे. अर्थात या गोष्टी सरकारकडे कर्मचाऱ्यांनी गुप्तपणे पोहोचविलेल्या असण्याची शक्यता अधिक आहे. एकंदरीतच एअर इंडियाच्या वर्क कल्चरवरून सरकार गंभीर आहे, हे यावरून दिसत आहे.