शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
3
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
4
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
5
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
6
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
7
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
8
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
9
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
10
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
11
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
12
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
13
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
14
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
15
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
16
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
17
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
18
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
19
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
20
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका

Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 13:01 IST

Air india plane crash ATC: एअर इंडियाच्या ड्रीमलायनर विमानाचा अपघात झाला. हा अपघात कसा झाला, याबद्दलचे वेगवेगळे अंदाज आणि तर्क लावले जात आहेत. दरम्यान, विमान कोसळण्यापूर्वीचा पायलट सुमित सभरवाल यांचा एक मेसेज एअर ट्रॅफिक कंट्रोलला मिळाला होता. तो काय होता?

Air India Plane crash pilot sumit Sabharwal News: अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर एअर इंडियाचे ड्रीमलायनर विमान कोसळले. ते कशामुळे पडले, या प्रश्नाभोवती सध्या चर्चा सुरू आहेत. वेगवेगळी कारणे, तर्क सांगितले जात आहेत. याच अपघाताच्या घटनेत नवीन माहिती समोर आली आहे, ज्यातून अपघाताचे कारण कळण्यास मदत होऊ शकते. विमान पडण्यापूर्वी वैमानिक सुमित सभरवाल यांनी एटीसी अर्थात हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला मेसेज पाठवला होता. त्यात त्यांनी विमान जमिनीच्या दिशेने जात असल्याचे कारण सांगितले होते. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

अहमदाबाद विमानतळाच्या धावपट्टीवरून उड्डाण केल्यानंतर विमान काही क्षणात बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाच्या इमारतीवर कोसळले. त्यानंतर मोठा स्फोट झाला आणि आगीच्या लोळांनी संपूर्ण परिसर कवेत घेतला. या घटनेत आतापर्यंत २७५ लोक मरण पावले आहेत. 

विमान का पडले? पायलट सुमित सभरवाल याचा मेसेज काय?

उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही सेंकदातच विमान पुन्हा जमिनीच्या दिशेने येऊ लागले. याच दरम्यान, सुमित सभरवाल यांनी हवाई नियंत्रण कशाला एक मेसेज पाठवला होता. ४ ते ५ सेंकदाच्या मेसेजमध्ये विमान खाली येण्याबद्दल त्यांनी माहिती दिली होती. 

पायलट सुमित सभरवाल यांनी हवाई नियंत्रण कक्षाला मेसेज केला की, मेडे मेडे मेडे... नो थ्रस्ट, लुजिंग पावर, अनेबल टू लिफ्ट. विमानाला समोर जाण्यासाठी पुरेशी शक्ती मिळत नाही. शक्ती कमी होत आहे. विमान वर उचलता येत नाहीये, असा मेसेज सुमित सभरवाल यांनी हवाई नियंत्रण कक्षाला पाठवला होता. 

नो थ्रस्ट म्हणजे काय, ज्याबद्दल सुमित सभरवालांनी माहिती दिली?

पायलट सुमित सभरवाल यांनी उल्लेख केलेला नो थ्रस्ट (No Thrust) म्हणजे इंजिन किंवा एखाद्या वाहनाच्या यंत्रणेमध्ये थ्रस्ट अर्थात पुढे ढकलण्याची शक्ती नसणे. 

एखाद्या वस्तूला (विमानाला) पुढे ढकलण्यासाठी जी प्रचंड ताकद लागते त्याला थ्रस्ट असे म्हणतात.. "नो थ्रस्ट" म्हणजे विमानाच्या इंजिनांमध्ये पुढे जाण्यासाठी कोणतीही शक्ती (थ्रस्ट) तयार होत नाहीये. इंजिन प्रचंड शक्ती निर्माण करते, जी विमानाला पुढे ढकलते, ज्यामुळे विमान हवेतून उडू शकते आणि वेगही वाढवता येतो.

वाचा >>एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय

आता जर नो थ्रस्ट परिस्थिती निर्माण झाली असेल, तर त्याची कारणे अशी असू शकतात. पहिले म्हणजे इंजिन सुरू नसतील किंवा फक्त सुरू आहेत, पण पुढे ढकलण्यासाठी लागणारी ऊर्जा त्यात तयार होत नसेल.

दुसरं म्हणजे विमानाला पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेली शक्ती मिळत नाही. त्यामुळे विमान उडू शकत नाही किंवा हवेत वेगाने पुढे जाऊ शकत नाही. हे इंजिनातील तांत्रिक समस्येमुळे, इंधन नसलं किंवा इंजिन बंद केल्यामुळे होऊ शकतं.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAir Indiaएअर इंडियाAccidentअपघातairplaneविमानahmedabadअहमदाबाद