शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 20:28 IST

Ahmedabad Plane Crash : २६ वर्षीय लॅमनुनथेम सिंगसन एअर इंडियाच्या फ्लाइट एआय १७१ मधील क्रू मेंबर होती.

अहमदाबाद विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या एअर इंडियाची केबिन क्रू लॅमनुनथेम सिंगसन हिचं पार्थिव गुरुवारी रात्री मणिपूरच्या कांगपोक्पी जिल्ह्यात तिच्या गावी पोहोचलं. २६ वर्षीय लॅमनुनथेम सिंगसन एअर इंडियाच्या फ्लाइट एआय १७१ मधील क्रू मेंबर होती. अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच हे विमान कोसळलं. या विमानात असलेल्या २४२ लोकांपैकी फक्त एक प्रवासी वाचला आहे. बाकी विमानातील सर्वांना यामध्ये आपला जीव गमवावा लागला आहे.  

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, लॅमनुनथेम लंडनला जाणाऱ्या एआय १७१ विमानाच्या क्रूचा भाग नव्हती. आजारपणामुळे रजा घेतलेल्या एका सहकाऱ्याच्या जागी ती गेली होती. लॅमनुनथेम सिंगसन तिच्या कुटुंबातील एकमेव कमावणारी सदस्य होती.  एका नातेवाईकाने सांगितलं की, ती तिच्या आईशी शेवटचं ११ जून रोजी फोनवर बोलली होती. लॅमनुनथेमने आईला सांगितलं होतं की, तिला गुरुवारी लंडनला जायचं आहे आणि त्यामुळे रात्री लवकर झोपायचं आहे.

शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं

सिंगसनचा चुलत भाऊ लुन किपगेन म्हणाला की, लॅमनुनथेम ही कुटुंबाचा आधार होती. कमावणारी एकमेव सदस्य होती. तिच्या आईने मुलांना वाढवण्यासाठी खूप संघर्ष केला. लॅमनुनथेमचा मोठा भाऊ बेरोजगार आहे आणि गंभीर आजाराने ग्रस्त आहे, तर दुसरा भाऊ शिक्षण घेत आहे. अपघाताची बातमी आल्यानंतर आईला मोठा धक्का बसला आहे. आईने खाणं-पिणं बंद केलं आहे.

आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

भयंकर! आईच्या डोळ्यादेखत १५ वर्षांचा लेक जिवंत जळाला; काळजात चर्र करणारी घटना

अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना मृतदेह ताब्यात देण्यात आले असून त्याचा आक्रोश मन हेलावून टाकत आहे. याच दरम्यान हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका आईसमोरच मुलाचा तडफडून मृत्यू झाला. तिने लेकाला जळताना पाहिलं. १५ वर्षांचा आकाश पटनीचा मृत्यू झाला आहे. आकाश विमानातही नव्हता आणि बीजे मेडिकल कॉलेजच्या परिसरात देखील नव्हता. तरी त्याला आपला जीव गमवावा लागला आहे. आकाशची आई सीताबेन आयपी कंपाऊंडमध्ये चहाची टपरी चालवते. आकाश त्याच्या आईसाठी जेवणाचा डब्बा घेऊन आला होता. 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादGujaratगुजरातAccidentअपघातAir Indiaएअर इंडिया