शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
6
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
7
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
8
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
9
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
10
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
11
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
12
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
13
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
14
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
15
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
16
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
17
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
18
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
19
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
20
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल

Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 21:01 IST

Vijay Rupani Plane Crash Dead: एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाल्यापासून एक फोटो व्हायरल होतोय. हा फोटो आहे गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा. पण, हा फोटो खरंच अपघात होण्यापूर्वी काढलेला आहे का?

Plane Crash News: एअर इंडियाचे विमान अहमदाबादमध्ये कोसळले. या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणीही आहेत, अशी माहिती समोर आली. त्यानंतर एक फोटो सोशल मीडियावर व्हायरला झाला. विजय रुपाणी पाठिमागे बसलेले आहेत आणि महिलेने सेल्फी फोटो काढला. पण, जो दावा या फोटोबद्दल केला जात आहे, तो खरा नाही. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

इंडिया टुडेने या फोटोची ज्यावेळी सत्यता पडताळली, तेव्हा वेगळीच माहिती समोर आली. जो दावा या फोटोबद्दल केला जात आहे, तो खोटा असल्याचे स्पष्ट झाले. 

विजय रुपाणींचा व्हायरल होत असलेला फोटो

विजय रुपाणांच्या फोटोबद्दल सत्य काय?

इंडिया टुडेने या फोटोची सत्यता पडताळणी केली. यात हा फोटो अपघात होण्यापूर्वीचा नसल्याचे समोर आले. विजय रुपाणी यांचा हा फोटो ऑक्टोबर २०२१ मधील आहे. ज्या महिलेने हा सेल्फी काढला आहे, त्या महिलेशी इंडिया टुडेने संपर्क केला होता आणि या फोटोबद्दल खात्री करून घेतली. फोटोत दिसणाऱ्या महिलेने हा फोटो २०२१ मधील असल्याचे सांगितले. 

वाचा >>मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?

विजय रुपाणी यांचा मृत्यू 

एअर इंडियाच्या विमान अपघातात मरण पावलेल्यांमध्ये माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश आहे. विजय रुपाणी हे लंडनला निघाले होते. त्यांची मुलगी लंडनमध्ये राहते. त्यांची पत्नी काही दिवसांपूर्वी लंडनला गेली होती आणि गुरुवारी (१२ जून) तेही भेटीसाठी लंडनला निघाले होते. 

२०४ मृतदेह काढले बाहेर, ४१ जणांवर उपचार सुरू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विमानातील २४० जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत २०४ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, मृतदेह पूर्णपणे जळलेल्या अवस्थेत आहे. काही मृतदेहांचे शिर आणि इतर अवयव तुटले गेले आहेत. या सगळ्यांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी केली जाणार आहे. पोलीस आयुक्ती दिलेल्या माहितीनुसार ४१ जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाVijay Rupaniविजय रूपाणीAir Indiaएअर इंडियाViral Photosव्हायरल फोटोज्Accidentअपघात