शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
4
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
6
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
7
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
8
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
9
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
10
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
11
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
12
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
13
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
14
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
15
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
16
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
17
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
18
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
19
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
20
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका

Air India Plane Crash: एवढ्या भीषण अपघातात 'त्या' चिमुकलीला खरचटलंही नाही, आई-वडिलांना अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2020 1:17 PM

त्या चिमुकलीला शोधण्यासाठी पोलिसांनी बचावकार्य राबवलं असता अखेर ती सापडली. विशेष म्हणजे एवढ्या भीषण अपघातातही तिला काही झालेलं नाही.

तिरुअनंतपूरम : केरळमधील कोझिकोडमधल्या भीषण विमान अपघाताने (Air India Express Crash) देशभरात खळबळ उडाली आहे. या अपघातात 14 प्रवाशांना जीवानिशी जावं लागलं आहे. तसेच  १२३हून अधिक प्रवासी जखमी आहेत. या जखमी प्रवाशांमध्ये एक लहान मुलगी बचावली आहे, सध्या तीच चर्चेचा विषय ठरत आहे. एवढ्या भीषण अपघातामधून तिची आणि पालकांची चुकामूक झाली होती.  त्या चिमुकलीला शोधण्यासाठी पोलिसांनी बचावकार्य राबवलं असता अखेर ती सापडली. विशेष म्हणजे एवढ्या भीषण अपघातातही तिला काही झालेलं नाही.विमानतळावर अपघातानंतर हरवलेल्या मुलीच्या शोधासाठी पालकांचा जीव कासावीस झाला होता. नंतर काही तासांमध्येच ती आपल्या पालकांकडे पोहोचली आणि सगळ्यांची जीव भांड्यात पडला. विशेष म्हणजे त्या चिमुकलीचे फोटो सोशल मीडियावरही व्हायरल झालेले होते. ती सुखरूप मिळावी यासाठी नेटकऱ्यांनी प्रार्थना केली होती. कोझिकोडेचा विमानतळ ‘टेबलटॉप’ म्हणजे डोंगरमाथ्यावर असलेल्या व धावपट्टीच्या दोन्ही बाजूंस दरी असलेला आहे. येथे धावपट्टीवरून धावताना विमान घसरून मोठा अपघात होण्याचा धोका आहे, असा इशारा हवाई वाहतूक सुरक्षा क्षेत्रातील तज्ज्ञ गेली अनेक वर्षे देत आले आहेत. अधिकृत माहितीनुसार शनिवार सायंकाळपर्यंत या अपघातातील मृतांचा आकडा १९ वर पोहोचला. १४९ जखमींपैकी २३ जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यापैकी तिघे व्हेंटिलेटरवर आहेत. २३ जखमींना उपचारांनंतर घरी पाठविण्यात आले आहे.जखमींवर कोझिकोडे व मल्लापुरम येथील इस्पितळांमध्ये उपचार सुरु आहेत. मृत्यू पावलेले वैमानिक कॅ. दीपक वसंत साठे व सहवैमानिक अखिलेश शर्मा यांच्या कुटुंबियांना विमान कंपनीने येथे आणण्याची व्यवस्था केली. उत्तरीय तपासणीनंतर दोघांचेही मृतदेह कुटुंबियांकडे सुपूर्द केले गेले.अपघातातील मृतांच्या कुटुंबांना केंद्र व केरळ सरकारने मिळून एकूण प्रत्येकी २० लाख रुपयांची मदत जाहीर केली. नागरी विमान वाहतूकमंत्री हरदीप सिंग पुरी व केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी यासंबंधीच्या घोषणा केल्या. केंद्र सरकारकडून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी १० लाख रुपये, गंभीर जखमींना प्रत्येकी दोन लाख रुपये तर किरकोळ जखमींना ५० हजार रुपये दिले जातील. केरळ सरकार मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी १० लाख रुपये देईल. शिवाय सर्व जखमींवरील उपचारांचा सर्व खर्च करेल.

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया