शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 09:29 IST

Air India Plane Crash Update: एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला, त्यावेळेपासून एक चित्रपट निर्माता बेपत्ता आहे. त्यांचे शेवटचे मोबाईल लोकेशन अपघाताच्या ठिकाणाजवळचं आढळून आले आहे. 

Plane Crash Update: एअर इंडियाच्याविमानाचा अहमदाबाद विमानतळाजवळअपघात झाला. ज्या वेळी हा अपघात झाला तेव्हापासून गुजरातमधील एक चित्रपट निर्माता बेपत्ता आहे. त्यांच्याशी संपर्कच होत नसल्याने कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन शोधण्यात आले, ते विमान पडले तिथून ७०० मीटर अंतरावर दिसले. त्यामुळे कुटुंबीय घाबरून गेले आहेत. प्रशासनाने कुटुंबीयांचे डीएनए चाचणीसाठी नमुने घेतले आहेत. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

एअर इंडियाचे एआय १७१ हे विमान अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही क्षणात कोसळले. हे विमान मेघानी नगर या नागरी भागातच पडले. त्यामुळे विमानातील प्रवाशांबरोबर त्या परिसरात असलेल्या काही नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. 

वाचा >>"लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता?" विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड

विमानातील २४१ प्रवाशांबरोबर घटनेवेळी त्या परिसरात असलेल्या २९ जणांचाही मृत्यू या भीषण अपघातात झाला आहे.  याच घटनेपासून गुजरातमधील एक चित्रपट निर्माते बेपत्ता आहेत. महेश कलावडिया असे त्यांचे नाव आहे. 

'ते घरी येत होते, पण पोहोचलेच नाही'

महेश कलावडिया यांना महेश जिरावाला नावानेही ओळखले जाते. नरोडामध्ये ते राहायला आहेत. त्यांची पत्नी हेतल यांनी याबद्दल माहिती दिली. 

हेतल यांनी सांगितलं की, "माझ्या पतीने दुपारी १.१४ वाजता कॉल मला सांगितलं की मीटिंग संपली आहे आणि मी घरी येत आहे. ते घरी येत होते. पण, जेव्हा ते घरी पोहोचले नाही, तेव्हा मी त्यांना कॉल केला. त्यांचा फोन बंद झाला होता. मी वारंवार कॉल केले. त्यानंतर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी त्यांचे शेवटचे लोकेशन शोधले. त्यांचे शेवटचे लोकेशन विमान कोसळले, त्या ठिकाणापासून ७०० मीटर दूर असल्याचे दिसले."

'ते कधीच त्या रस्त्याने येत नाहीत'

हेतल म्हणाल्या, 'अंदाजे १.४० वाजता त्यांच्या मोबाईलचे नेटवर्क गेले. त्यांचा मोबाईल आणि स्कूटर दोन्हीही गायब आहे. सगळ्यात आश्चर्याची बाब म्हणजे ते कधीच त्या रस्त्याने घरी येत नव्हते, जिथे त्यांचे शेवटचे लोकेशन मिळाले आहे. आम्ही आता डीएनए चाचणीसाठी नमुने दिले आहेत. विमान अपघातात जमिनीवर असलेल्यांपैकी काही लोकांचा मृत्यू झाला. त्यामध्ये ते तर नाहीत ना, हे शोधण्यासाठी डीएनए चाचणी केली जाणार आहे."

मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर पडले होते विमान

१२ जून रोजी दुपारी १.३९ वाजता एअर इंडियाचे विमान पडले होते. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमान लंडनला जाण्यासाठी झेपावले. पण, काही क्षणातच जमिनीवर कोसळले होते. यात वैद्यकीय शिक्षक घेणाऱ्या विद्यार्थ्यांचाही मृत्यू झाला आहे. या विमानातील केवळ एकच प्रवाशी वाचला.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAir Indiaएअर इंडियाairplaneविमानAccidentअपघातahmedabadअहमदाबाद