शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 14:54 IST

Air India plane crash Update: ज्या ठिकाणी एअर इंडियाचे एआय१७१ विमान कोसळले, तिथे अजूनही शोध कार्य सुरू आहे. त्याचबरोबर विमानाचे वेगवेगळे झाले भाग हटवले जात असून, छतावर अडकलेल्या शेपटीमध्ये एक मृतदेह आढळला आहे. 

Plane Crash News: लंडनला जाणारे एअर इंडियाचेविमान अहमदाबाद विमानतळावरून झेपावले, पण काही सेंकदांमध्येच ते जमिनीवर पडले. या भीषण घटनेत आतापर्यंत २७५ जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही घटनास्थळी शोध कार्य सुरूच असून, शनिवारी हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या सांगाड्यात एक मृतदेह चिकटलेल्या अवस्थेत आढळून आला. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

घटनास्थळी शोध आणि मदत कार्य सुरूच आहे. विमानांचे वेगवेगळे भाग हटवले जात आहेत. त्याचबरोबर श्वानांच्या मदतीनेही काही मृतदेहांचा शोध घेतला जात आहे. या अपघातात विमानाची शेपटी बीजे वैद्यकीय महाविद्यालयाच्या छतावर अडकली होती. 

वाचा >>'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?

ही शेपटी खाली उतरवण्याचे काम सुरू करत असताना शनिवारी त्यात एक मृतदेह अडकलेल्या अवस्थेत आढळून आला. हा मृतदेह बाहेर काढून खाली आणण्यात आला. त्यानंतर तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. हा मृतदेह कुणाचा, याबद्दल निश्चित माहिती मिळू शकली नसली, तरी तो एअर होस्टेसचा असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 

२७० मृतदेहांचे शवविच्छेदन

अहमदाबाद सिव्हिल रुग्णालयात विमान अपघातातील मृतदेह नेण्यात येत आहेत. आतापर्यंत २७० मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. त्याचबरोबर २३० मृतदेहांची डीएनए नमुने घेण्यात आले आहेत. आतापर्यंत ८ मृतदेहांची ओळख पटली आहे.   

एअर इंडिया फ्लाईट नंबर १७१ बंद करणार

एआय १७१ या ड्रीमलायनर विमानाचा भयंकर अपघात झाला. या भीषण घटनेनंतर एअर इंडियाने १७१ हा फ्लाईट नंबर कायमचा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वसामान्यपणे कोणत्याही भयंकर अपघातानंतर हवाई वाहतूक करणारी विमान कंपनी त्या विमानाचा नंबर बंद करते. 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAir Indiaएअर इंडियाairplaneविमानAccidentअपघातahmedabadअहमदाबाद