शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांत मोदींचे रेकॉर्डब्रेक परदेश दौरे; पण खर्च मनमोहन सिंगांपेक्षा कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 19:39 IST

मोदींच्या 44 परदेश दौऱ्यावर 443.4 कोटी रुपयांचा खर्च

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यांवर 443.4 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. याबद्दलचं बिल एअर इंडियानं पंतप्रधान कार्यालयाला पाठवलं आहे. मात्र यामध्ये एअर इंडियानं मोदींच्या पाच परदेश दौऱ्यांच्या खर्चाचा समावेश केलेला नाही. मोदींनी मे 2014 पासून 44 आंतरराष्ट्रीय दौरे केले. याआधी कोणत्याही पंतप्रधानानं मोदींइतके परदेश दौरे केलेले नाहीत, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयानं दिली. पंतप्रधान मोदी या महिन्याच्या अखेरीस संयुक्त अरब अमिरातला जाण्याची शक्यता आहे. संयुक्त अरब अमिरातनं नुकताच मोदींना सर्वोच्च नागरी सन्मान घोषित केला. दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नांबद्दल मोदींना हा सन्मान देण्यात येणार आहे. त्यासाठी मोदी महिन्याच्या शेवटी संयुक्त अरब अमिरातला जाऊ शकतात. मोदींनी सर्वाधिक परदेश दौरे केले असले, तरी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या तुलनेत त्यांच्या दौऱ्यांचा खर्च कमी आहे. मनमोहन सिंग यांनी 2009 ते 2014 या कालावधीत 38 परदेश दौरे केले. यासाठी 493.22 कोटी रुपयांचा खर्च आला. मोदींच्या परदेश दौऱ्याच्या तुलनेत हा खर्च 50 कोटींनी जास्त आहे. मोदींनी एकाचवेळी अनेक देशांना भेटी दिल्या आहेत. एकदा प्रवास सुरू झाल्यावर ते बऱ्याच देशांना भेटी देऊन परततात. त्यामुळेच त्यांनी जास्त देशांना भेटी देऊनही त्यांच्या प्रवासावरील खर्च कमी आहे. 2015 मध्ये मोदींनी एकाच दौऱ्यात उझबेकिस्तान, कझाकस्तान, रशिया, तुर्कमेनिस्तान, किरगिझिस्तान आणि ताजिकिस्तानला भेटी दिल्या होत्या. मोदींनी त्यांच्या 16 पेक्षा अधिक दौऱ्यांमध्ये एकाहून जास्त देशांना भेटी दिल्या. मोदींनी सहा आंतरराष्ट्रीय दौऱ्यांसाठी भारतीय हवाई दलाचं बिझनेस जेट (बोईंग 737) वापरलं. या दौऱ्यांना कोणताही अतिरिक्त खर्च आला नाही. मोदी हवाई दलाच्या बोईंग 737नं नेपाळ, इराण, बांग्लादेश आणि सिंगापूरला गेले होते. व्हीव्हीआयपींसाठी हे विमान वापरलं जातं. याउलट सिंग यांच्या कार्यकाळात एअर इंडिया वनचा वापर बांगलादेश, सिंगापूरसारख्या कमी अंतराच्या प्रवासासाठीही करण्यात आला होता.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीManmohan Singhमनमोहन सिंगAir Indiaएअर इंडिया