शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 11:57 IST

Air India: एअर इंडियाने निवेदन जारी करुन गैरसोईबद्दल खेद व्यक्त केला.

Air India: अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडिया एअरलाईन चर्चेत आहे. त्या घटनेनंतर एअर इंडियाची अनेक उड्डाणे विविध कारणांमुळे रद्द झाली आहेत किंवा उड्डाणानंतर आपत्कालीन लँडिंग करावी लागली आहे. अशातच आता दिल्लीहून बालीला जाणारे एअर इंडियाचे विमान AI2145 अर्ध्या वाटेतून परतल्याची माहिती समोर आली आहे. ज्या विमानतळावर विमान उतरणार होते, त्या विमानतळाजवळ ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे हा निर्णय घेतला आहे.

एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...

एअर इंडियाने त्यांच्या निवेदनात म्हटले की, 'आज(१८ जून २०२५) रोजी बाली विमानतळाजवळ ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे दिल्लीहून बालीला जाणारे विमान AI2145 दिल्लीला परतले. प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. विमान दिल्लीत सुरक्षितपणे उतरले असून, सर्व प्रवासीदेखील सुरक्षित आहेत.'

एअरलाइनने निवेदनात प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल खेद व्यक्त केला आहे आणि म्हटले की, 'विमान माघारी परतल्यामुळे प्रवाशांची हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे. गैरसोय कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.' याशिवाय, कंपनीने प्रवाशांना तिकीट रद्द केल्यास किंवा त्यांच्या पसंतीनुसार वेळापत्रक बदलल्यास पूर्ण परतफेडीची ऑफरदेखील दिली आहे.

एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द

खराब हवामानामुळे १४ उड्डाणे वळवण्यात आलीदरम्यान, काल(मंगळवारी) संध्याकाळी खराब हवामानामुळे दिल्ली विमानतळावर १४ उड्डाणे वळवण्यात आली होती. एका अधिकाऱ्याने सांगितले की, भोपाळला सहा, चंदीगडला तीन, अमृतसरला दोन, अहमदाबाद, वाराणसी आणि लखनऊला प्रत्येकी एक उड्डाण पाठवण्यात आले.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाairplaneविमानdelhiदिल्लीIndonesiaइंडोनेशियाPlane Crashविमान दुर्घटनाVolcanoज्वालामुखी