लघुशंका प्रकरणानंतर Air India चा मोठा निर्णय! आता सॉफ्टवेअर प्रत्येकावर ठेवणार नजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 14:09 IST2023-01-30T14:07:54+5:302023-01-30T14:09:19+5:30
काही दिवसापूर्वी एअर इंडियाच्या एका विमानात एका महिलेवर एका सहप्रवासी व्यक्तीने लघुशंका केल्याचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणी एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यातही घेतले होते.

लघुशंका प्रकरणानंतर Air India चा मोठा निर्णय! आता सॉफ्टवेअर प्रत्येकावर ठेवणार नजर
काही दिवसापूर्वी एअर इंडियाच्या एका विमानात एका महिलेवर एका सहप्रवासी व्यक्तीने लघुशंका केल्याचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणी एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यातही घेतले होते, तर दुसरीकडे एअर इंडियानेही कारवाई केली होती. पायलटसह विमानातील मेंबर्सची चौकशी करण्यात आली होती. यानंतर आता एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला आहे.
आता विमानात अशा घडणाऱ्या घटनांवर सॉफ्टवेअर नजर ठेवणार आहे. अशा पद्धतीची एखादी घटना जर फ्लाइटमध्ये घडली तर पायलट सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सर्व गोष्टी अपलोड करणार आहे. याचे कारण म्हणजे विमानात घडणाऱ्या सर्व गोष्टींची माहिती एअर इंडियातील अधिकाऱ्यांना माहिती असावी हा उद्देश आहे.
Komaki LY इलेक्ट्रिक स्कूटर, अँटी थेफ्ट अलार्मसह सिंगल चार्जमध्ये 85 किमीपर्यंत रेंज
काही दिवसातच एअर इंडिया आपल्या क्रु मेंबर्स आणि पायलटांना आयपॅड देणार आहे. १ मे पासून विमानात घडणाऱ्या सर्व घटना यात अपलोड कराव्या लागणार आहेत. याअगोदर या सर्व घटना पेपरवरती लिहून द्याव्या लागत होत्या, त्या आता सॉफ्टवेअरच्या माध्यमातून अपलोड कराव्या लागणार आहेत. यामुळे आता घडणाऱ्या सर्व घटना अधिकाऱ्यांपर्यंत लगेच पोहोचणार आहेत.
काही दिवसापूर्वी पॅरिसहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातील लघुशंका प्रकरणावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. आरोपी पुरुष दारूच्या नशेत होता आणि केबिन क्रूच्या सूचनांचे पालन करत नसल्याचे विमानतळ सुरक्षेला सांगण्यात आले. त्याने मद्यधुंद अवस्थेत महिला प्रवाशाच्या ब्लँकेटवर लघुशंका केली. यानंतर आरोपी व्यक्तीला सीआरपीएफने दिल्लीत पकडले होते.