शहरं
Join us  
Trending Stories
1
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
2
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

हवाई दलाची 'बाहुबली' बैठक; याच आठवड्यात राफेल येतेय, थेट चीनच्या सीमेवर तैनाती?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 5:45 PM

राफेल हे लढाऊ विमान चीनच्या विमानांसह अमेरिकेच्या पाकिस्तानला दिलेल्या एफ-16 लढाऊ विमानांवर हल्ला करण्यासाठी ताकदवान आहे. तसेच अत्याधुनिक क्षेपणास्त्रे, अण्वस्त्रे वाहून नेण्याचीही क्षमता आहे.

नवी दिल्ली : भारत आणि चीनदरम्यान भलेही शांततेचे वातावरण असले तरीही भारतीय सैन्य कोणत्याही बाबतीत कमतरता ठेवू इच्छित नाहीय. या महिन्याच्या अखेरीस भारताला राफेल विमान मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर हवाई दलाकडून दोन दिवसांची बैठक बोलावण्यात आली असून हवाई दल प्रमुख आर के अस भदौरिया यांच्यासह हवाईदलाचे मोठे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये चीनच्या सीमेवरील सध्याच्या परिस्थितीवर चर्चा केली जाणार आहे. 

या बैठकीमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर राफेलही तैनात केले जाण्याची शक्यता आहे. राफेल हे जगातील सर्वात शक्तीशाली लढाऊ विमानांपैकी एक आहे. राफेल देशात आल्या आल्याच जर सीमेवर तैनात झाले तर हवाई दलाची ताकद आणखी वाढणार आहे. याशिवाय दक्षिण आशियामध्ये मानसिक दबावासाठीही परिणामकारक ठरणार आहे. 

राफेल हे लढाऊ विमान चीनच्या विमानांसह अमेरिकेच्या पाकिस्तानला दिलेल्या एफ-16 लढाऊ विमानांवर हल्ला करण्यासाठी ताकदवान आहे. तसेच अत्याधुनिक क्षेपणास्त्रे, अण्वस्त्रे वाहून नेण्याचीही क्षमता आहे. चीनच्या सीमेवर भारताची सुखोई-30 आणि मिराज 2000 ही लढाऊ विमाने तैनात आहेत. राफेल या सोबत आल्यास भारताच्या लांब पल्ल्यावर मारा करण्याच्या क्षमतेत वाढ होणार आहे. 

वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, येत्या 22 तारखेला हवाई दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मॅरेथॉन बैठक होणार आहे. यामध्ये देशाच्या सुरक्षेवर चर्चा केली जाणार आहे. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार भदौरिया यांच्या नेतृत्वात ही बैठक होणार असून या बैठकीचा मुख्य हेतू हा चीनच्या सीमेवरील परिस्थिती आणि लडाखमध्ये तैनाती असणार आहे. या बैठकीमध्ये सातही कमांडर-इन-चीफ सहभागी होणार आहेत. 

मोठी शक्ती मिळणारपुढील आठवड्यात भारतीय हवाई दलाला मोठी ताकद मिळणार आहे. राफेल लढाऊ विमाने पंजाबच्या अंबाला हवाईतळावर उतरविण्यात येणार आहेत. सुरक्षा मंत्रालयाने एएनआयला दिलेल्या माहितीनुसार दोन सीट असलेली तीन प्रशिक्षण विमानांसह पहिली ४ राफेल लढाऊ विमाने थेट फ्रान्सहून उड्डाण करणार आहेत. ही विमाने आरबी सिरीजची असणार आहेत. पहिले विमान १७ गोल्डन एरोजचे कमांडिंग ऑफिसर फ्रान्सच्या पायलटसोबत उड्डाण करणार आहे. हे विमान हवाईदलाचे प्रमुख आरकेएस भदौरिया यांच्या सन्मानासाठी झेप घेणार आहे. भदौरिया यांनी या राफेल विमानांच्या करारावेळी महत्वाची भूमिका निभावली होती.

अन्य महत्वाच्या बातम्या...

बाबो! वर्षाला दोन लाख उत्पन्न; स्वीस बँकेत मात्र 196 कोटी; ITAT ची कारवाई

चीन गांगरला! जपान भारतापेक्षाही जबर दणका देण्याच्या तयारीत; 57 कंपन्यांना दिले आदेश

SBI चा करोडो ग्राहकांना निर्वाणीचा इशारा; Video पहाल तर वाचाल

दुधाची पिशवी कोरोना फ्री आहे का? कसे सॅनिटाईज कराल...FSSAI ने दिले उत्तर

चॅलेंज! कोरोनावर जगात कोणीही लस शोधुदे; भारताशिवाय उत्पादन अशक्यच

Video: "सुशांतचा आत्मा स्वर्गात, त्याच्यासोबत महिलाही"; जगप्रसिद्ध पॅरानॉर्मल एक्स्पर्टचा दावा

ब्रिटन गेमचेंजर ठरणार! मृत्यूच्या दाढेतील कोरोनाबाधितांना वाचविले; स्टेरॉईडची चाचणी यशस्वी

चीन चवताळला! दक्षिण समुद्रात घुसलेल्या अमेरिकेला दिले चोख प्रत्यूत्तर

लॉकडाऊनमध्ये भविष्याची चिंता; लोकांची या सरकारी योजनेकडे 'उडी', तुम्हीही विचार करा...

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलindian air forceभारतीय हवाई दलchinaचीनindia china faceoffभारत-चीन तणाव