"आमची डीएनए चाचणी करा, आम्ही तयार आहोत", मोहन भागवतांच्या विधानावर ओवैसींचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 01:52 PM2021-09-07T13:52:46+5:302021-09-07T13:53:31+5:30

asaduddin owaisi : अखिलेश यांनी त्यांच्या सरकारच्या काळात योगींविरोधात खटला चालवला असता तर योगी काही करू शकले नसते. कारण त्या सर्वांना मुस्लिमांनी पुढे जावे असे वाटत नाही, असे असदुद्दीन ओवैसी यांनी सांगितले.

aimim leader asaduddin owaisi in lucknow attacks bjp and sp rss statement elections | "आमची डीएनए चाचणी करा, आम्ही तयार आहोत", मोहन भागवतांच्या विधानावर ओवैसींचा पलटवार

"आमची डीएनए चाचणी करा, आम्ही तयार आहोत", मोहन भागवतांच्या विधानावर ओवैसींचा पलटवार

Next

लखनऊ : आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीवरून राजकीय दंगल सुरू झाली आहे. AIMIMचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी हे उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. या दरम्यान माजी खासदार अतिक अहमद यांची पत्नी शाइस्ता परवीन यांनी  AIMIM मध्ये प्रवेश केला. यावेळी असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला.

ज्या नेत्यांची नावे मुझफ्फरनगर दंगलीत आली होती, त्यांच्याकडून खटला मागे घेण्यात आल्याचे असदुद्दीन ओवैसी म्हणाले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरील खटलेही मागे घेण्यात आले. प्रज्ञा आणि कुलदीप सेंगरसारखे नेते लोकप्रिय असतील, परंतु अतीक अहमद किंवा मुख्तार अन्सारी यांना बाहुबली म्हटले जाते, असे म्हणत असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपावर टीका केली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या विधानावर असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, आमची डीएनए चाचणी करा, आम्ही तयार आहोत. पण तुम्हा सर्वांनाही ती करावे लागेल. हे लोक भारताचे संविधान स्वीकारणार नाहीत, पण डीएनए चाचणी करून घेतील. आरएसएसवाले इतिहासात कमकुवत आहेत. दरम्यान, मोहन भागवत यांनी म्हटले होते की, भारतातील हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज एकच आहेत.

याचबरोबर, असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, पक्षांना 19 टक्के मुस्लिमांनी त्यांची गुलामगिरी करावी असे वाटते, पण कोणीही हिस्सेदारीबाबत बोलत नाही. अखिलेश यांनी त्यांच्या सरकारच्या काळात योगींविरोधात खटला चालवला असता तर योगी काही करू शकले नसते. कारण त्या सर्वांना मुस्लिमांनी पुढे जावे असे वाटत नाही, असे असदुद्दीन ओवैसी यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनुप्रिया पटेल यांना मंत्रीही केले. कारण जातीच्या मतांची गरज आहे. पण जेव्हा मुस्लिमांचा प्रश्न येतो, तेव्हा मुद्दा जातीय बनतो. मुस्लिमांनी राजकीय पक्षांना भरपूर मतदान केले, पण कोणीही जिंकू शकले नाही, असे असदुद्दीन ओवैसी म्हणाले.

काय म्हणाले होते मोहन भागवत?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुंबईत आयोजित 'राष्ट्रप्रथम-राष्ट्र सर्वोपरी' कार्यक्रमात संबोधित करताना ब्रिटिशांनी हिंदू-मुस्लिम यांच्यात कटुता निर्माण करण्याचे काम केल्याचे म्हटले आहे. "भारतात हिंदूंसोबत राहिलं तर काहीच मिळणार नाही. फक्त हिंदूंचीच निवड केली जाईल आणि इस्लाम धर्म संपुष्टात येईल असा गैरसमज ब्रिटिशांनी मुस्लिम नागरिकांमध्ये निर्माण केला. यातूनच हिंदू-मुस्लिम यांच्यात शत्रुत्व निर्माण करण्याचे काम ब्रिटिशांनी केले", असे विधान मोहन भागवत यांनी केले आहे. 

ब्रिटिशांनी भारतात एक गैरसमजूतीचे वातावरण निर्माण केले. हिंदू आणि मुस्लिमांमध्ये एकमेकांबद्दल द्वेष निर्माण होईल अशी माहिती पसरवली. वेगळ्या राष्ट्राच्या मागणीसाठी त्यांनी मुस्लिमांना प्रवृत्त केले. इस्लाम धर्म भारतातून नष्ट होईल असे सांगितले गेले. पण तसे झालंय का? तर नाही. मुस्लिमांना आज सर्व स्तरांमध्ये हक्काचे स्थान आहे, असे मोहन भागवत म्हणाले.  ब्रिटिशांना जे हवे होते ते त्यांनी त्यावेळी साध्य केले. दोन धर्मांमध्ये द्वेष पसरवला आणि फोडाफोडी केली. आपल्याला आपला दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे. भारतीय हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वच एकच होते. प्रत्येक भारतीय हा हिंदूच आहे, असेही ते म्हणाले. 

Web Title: aimim leader asaduddin owaisi in lucknow attacks bjp and sp rss statement elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.