गिरिराज सिंहांना भेटण्यासाठी थेट त्यांच्या ऑफिसात का पोहोचले असदुद्दीन ओवेसी? कोण कोण होतं सोबत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 20:39 IST2024-12-10T20:39:01+5:302024-12-10T20:39:40+5:30
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी मंगळवारी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांची त्यांच्या दिल्ली येथील ऑफिसात जाऊन भेट घेतली.

गिरिराज सिंहांना भेटण्यासाठी थेट त्यांच्या ऑफिसात का पोहोचले असदुद्दीन ओवेसी? कोण कोण होतं सोबत?
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी मंगळवारी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांची त्यांच्या दिल्ली येथील ऑफिसात जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांच्या सोबत मालेगावचे आमदार मुफ्ती इस्माइल कासमी आणि पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलीलही उपस्थित होते.
या भेटीसंदर्भात माहिती देताना असदुद्दीन ओवेसी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर म्हटले आहे, "दहा सदस्यीय शिष्टमंडळाने वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांची भेट घेतली आणि त्यांना मालेगावमधील यंत्रमाग उद्योगाच्या समस्यांची माहिती दिली, ज्यात 5 लाख युनिट्स आहेत. शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्र्यांना मालेगावला भेट देण्याचीही विनंतीही केली आहे."
A ten-member delegation met @TexMinIndia@girirajsinghbjp to brief him about the problems facing powerloom industry of Malegaon, which includes 5 lakh units. The delegation also requested the Minister to visit Malegaon
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) December 10, 2024
The delegation included Malegaon MLA @MuftiIsmailQsm… pic.twitter.com/5JcmLzB68n
गिरिराज सिंहांकडून समस्यांवर मार्ग काढण्याचे आश्वास -
ओवेसी यांनी पुढे म्हणाले आहे, "या शिष्टमंडळात मालेगावचे आमदार मुफ्ती इस्माईल कासमी, एआयएमआयएम महाराष्ट्राचे अध्यक्ष इम्तियाज जलील आणि अधिवक्ता मोमीन मुजीब अहमद यांचा समावेश होता. मंत्र्यांनी या समस्यांकडे लक्ष देऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन दिले आहे."