शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

सुशांतच्या विसरा रिपोर्टमधून महत्त्वाची माहिती समोर; तपासाला मिळणार वेगळं वळण?

By कुणाल गवाणकर | Updated: September 21, 2020 17:53 IST

एम्समधील डॉक्टरांकडून सुशांतच्या विसराची चाचणी; लवकरच अहवाल सीबीआयला देणार

नवी दिल्ली: अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अद्यापपर्यंत सीबीआयच्या हाती फारसं काही लागलेलं नाही. सुशांतची हत्या झाली हे सिद्ध करणारा एकही पुरावा सीबीआयला सापडलेला नाही. मात्र आता सुशांतच्या विसराची तपासणी करणाऱ्या एम्सच्या डॉक्टरांना काही महत्त्वाच्या गोष्टी सापडल्या आहेत. सुशांतच्या विसरामध्ये डॉक्टरांना काही केमिकलचे अंश आढळून आले आहेत. मात्र अद्याप डॉक्टरांकडून सुरू असलेली तपासणी पूर्ण झालेली नाही.सुशांतच्या मृत्यूचे गूढ उकलण्याची शक्यता, सीबीआय आणि एम्सच्या टीमची उद्या महत्वपूर्ण बैठक एम्समधील डॉक्टरांना सुशांतच्या विसराच्या तपासणीतून महत्त्वाच्या गोष्टी हाती लागल्या आहेत. पोटाचा भाग, छोटं आतडं, यकृताचा एक तृतीयांश भाग, पित्ताशय, दोन्ही किडण्यांचा काही भाग, १० मिली रक्त आणि डोक्यावरील केसांचं निरीक्षण डॉक्टरांकडून करण्यात आलं. यामध्ये डॉक्टरांना काही प्रमाणात केमिकलचे अंश सापडले. सुशांतच्या मृत्यूसाठी हे केमिकलचे अंश कारणीभूत होते का, याचा शोध सीबीआयच्या टीमकडून घेतला जाईल. त्यामुळे आता सीबीआयचा तपास महत्त्वाच्या टप्प्यात येण्याची शक्यता आहे.सुशांत घाबरायचा, म्हणून मित्रांजवळ ड्रग्ज ठेवायचा...! रिया चक्रवर्तीचा NCB समोर मोठा खुलासाएम्सची फॉरेन्सिक टीम विसरा तपासणीतून समोर आलेल्या निरीक्षणांची आणि निष्कर्षांची माहिती सीबीआयला देईल. त्यांना केमिकलच्या अंशांची पूर्ण माहिती दिली जाईल. त्यानंतर सीबीआयची टीम या केमिकलचा संबंध सुशांतच्या मृत्यूशी आहे का, याचा शोध घेण्यास सुरुवात करेल. सुशांतच्या शरीरात सापडलेल्या केमिकलचा संबंध हत्या करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विषाशी नसल्याचं एम्सच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.सारा अली खानसोबत सुशांतने पहिल्यांदा घेतला होता ड्रग्सचा हेवी डोस, रियाचा NCBसमोर खुलासा डॉक्टरांकडून करण्यात आलेली तपासणी सुरूच असल्यानं वैद्यकीय बोर्डाची बैठकही झालेली नाही. एमच्या मेडिकल बोर्डाची बैठक या आठवड्यात होऊ शकते. त्यात विसरा तपासणी करणाऱ्या डॉक्टरांचं पथक आपले निष्कर्ष मांडतील. यानंतर याचा सविस्तर अहवाल सीबीआयला सोपवला जाईल. विसरा तपासणीचं काम डॉक्टर सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील पथक करत आहे. गुप्ता हे फॉरेन्सिकमधील तज्ज्ञ आहेत.

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतCBIगुन्हा अन्वेषण विभागAIIMS hospitalएम्स रुग्णालय