अभ्यासासाठी दिलेल्या मोबाइलवरून मुलीने न्यूड फोटो शेअर केले, कळताच आई-वडिलांना Heart Attack
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 18:43 IST2021-08-30T18:41:18+5:302021-08-30T18:43:19+5:30
एक घटना गुजरातच्या अहमदाबादमधून समोर आली आहे. इथे एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने फोनवरून सोशल मीडियावर तिचे न्यूड फोटोज शेअर केले.

अभ्यासासाठी दिलेल्या मोबाइलवरून मुलीने न्यूड फोटो शेअर केले, कळताच आई-वडिलांना Heart Attack
(Image Credit : pikist.com) (प्रातिनिधिक छायाचित्र)
कोरोना काळात अजूनही शाळा पूर्णपणे सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत. अशात मुलांना मोबाइल दिले जात आहेत. त्यांचा जास्तीत जास्त वेळ मोबाइलवरच जात आहे. मात्र, मुलांकडून मोबाइल दुरूपयोग होण्याच्याही अनेक घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना गुजरातच्याअहमदाबादमधून समोर आली आहे. इथे एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने फोनवरून सोशल मीडियावर तिचे न्यूड फोटोज शेअर केले. जेव्हा याची खबर तिच्या आई-वडिलांना लागली तर त्यांना हार्ट अटॅक आला.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ च्या रिपोर्टनुसार, ऑनलाईन क्लाससाठी दिलेल्या मोबाइलवरून या मुलीने केवळ तिने न्यूड फोटोच सोशल मीडियावर शेअर केले नाही तर ती तिच्या चुलत बहिणींनाही असं करण्यासाठी भडकवत होती. आपल्या मुलीच्या या कारनाम्यामुळे हैराण आई-वडिलांनी १८१ हेल्पलाइनची मदत घेतली. त्यांनी काउन्सेलरला सांगितलं की, त्यांनी मुलीला ऑनलाईन क्लाससाठी मोबाइल दिला. तसेच तिच्यासाठी एक वेगळी रूमची व्यवस्था केली जेणेकरून तिला शांततेत अभ्यास करता यावा.
कसा झाला खुलासा?
पालकांनी सांगितलं की, त्यांची मुलगी तिच्या प्रायव्हेट पार्ट्सचे फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट करू लागली. इतकंच नाही तर ती तिच्या चुलत बहिणींनाही तिला सोशल मीडियावर फॉलो करण्यास आणि तसे फोटो शेअर करण्यास सांगत होती. मुलीच्या या कारनाम्याची माहिती आई-वडिलांना नातेवाईकांकडून समजली. ज्यामुळे त्यांना हार्ट अटॅक आला. काही दिवसांच्या उपचारानंतर दोघेही बरे झाले. पण मुलीने तरीही तिचे कारनामे बंद केले नाहीत. त्यानंतर पालकांनी हेल्पलाइनची मदत घेतली.
काय म्हणाली मुलगी?
हेल्पलाइनच्या काउन्सेलरने मुलीला भेटण्यासाठी बोलवलं आणि तिला समजावून सांगितलं की, ती सायबर क्राइम करत आहे. त्यानंतर मुलीने आश्वासन दिलं की, आता ती मोबाइलचा वापर केवळ तिच्या आई-वडिलांच्या समोरच करेल. नंतर मुलीने तिचं सोशल मीडिया अकाउंटही डिलीट केलं. मुलगी म्हणाली की, आता ती मोबाइलचा वापर फक्त ऑनलाइन क्लासेससाठीच करेल. त्याशिवाय ती मोबाइलला हातही लावणार नाही.