Ahmedabad ready for Trump's welcome | ट्रम्प यांच्या स्वागतासाठी अहमदाबाद सज्ज

ट्रम्प यांच्या स्वागतासाठी अहमदाबाद सज्ज

ह्यूस्टन : मागील वर्षी सप्टेंबरमध्ये अमेरिकेत ऐतिहासिक ‘हाउडी मोदी’ कार्यक्रम आयोजित करणाऱ्या टीमचे असे म्हणणे आहे की, ट्रम्प यांचा भारत दौरा द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून ट्रम्प हे २४ आणि २५ रोजी भारताच्या दौºयावर येत आहेत. ट्रम्प यांच्या स्वागतासाठी अहमदाबाद सज्ज झाले आहे.

जगातील सर्वांत मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर अहमदाबादेतील मोटेरा स्टेडियमवर पंतप्रधान मोदी यांच्यासोबत ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ट्रम्प आणि मोदी यांनी सप्टेंबरमध्ये ह्यूस्टनमध्ये भारत आणि अमेरिकी नागरिकांसोबत हाउडी मोदी कार्यक्रमास हजेरी लावली होती. आता भारतात नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमात हे दोन नेते एकत्र येत आहेत. स्टेडियममध्ये रॅलीने जाण्यासाठी रोड शो करण्यात येणार आहे. ह्यूस्टनमधील हाउडी मोदी कार्यक्रमाचे संयोजक जुगल मलानी यांनी म्हटले आहे की, नमस्ते ट्रम्प कार्यक्रमासाठी आयोजक खूप मेहनत करीत आहेत. या दोन्ही नेत्यांनी ह्यूस्टनमध्ये हाउडी मोदी कार्यक्रमात ५० हजार भारतीय-अमेरिकींना संबोधित केले होते. हाउडी मोदीचे आयोजक टेक्सास इंडिया फोरम हे पाहून आनंदी आहे की, या कार्यक्रमाने अमेरिका-भारत संबंधांना नवे परिमाण दिले आहे.

Web Title: Ahmedabad ready for Trump's welcome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.