अहमदाबाद विमान अपघातात विमानातील २४२ पैकी २४१ जणांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. मृतदेहांची ओळख पटवणंही कठीण झालं आहे. या दुर्घटनेत अहमदाबादचे रहिवासी अनिल पटेल यांनी त्यांचा एकुलता एक मुलगा हर्षित आणि सून पूजा यांना गमावलं आहे, परंतु आता अनिल यांना एकच आशा आहे की, प्रशासन त्यांच्या मुलाचा आणि सुनेचा मृतदेह लवकरच त्यांच्या स्वाधीन करेल.
हर्षित पटेल दोन वर्षांनी त्यांच्या कुटुंबाला न कळवता लंडनहून भारतात आले होते, त्यांना कुटुंबीयांना सरप्राईज द्यायचं होतं. हे सरप्राईज शेवटचं ठरलं आहे. हर्षित आणि पूजा गेल्या दोन वर्षांपासून लंडनमध्ये राहत होते. काही महिन्यांपूर्वी पूजा गर्भवती होती, परंतु दुर्दैवाने तिचं मिसकॅरेज झालं. उपचार अपूर्ण राहिल्याने दोघांनीही भारतात परतण्याचा निर्णय घेतला. ते १५ दिवसांपूर्वी अहमदाबादला आले होते, जेणेकरून कुटुंबासोबत वेळ घालवता येईल.
हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
लंडनला परत जाण्याची त्यांची फ्लाइट १२ तारखेची होती. पण आता नशिबाने सर्व काही हिरावून घेतलं. अपघाताच्या दिवशी अनिल पटेल यांनी डीएनए नमुना दिला होता, जेणेकरून त्यांचा मुलगा आणि सुनेची ओळख पटेल. त्यांचे नाव जिल्हाधिकाऱ्यांच्या यादीत आहे आणि प्रशासनाने ७२ तासांत ही प्रक्रिया पूर्ण होईल असं आश्वासन दिलं आहे. अनिल पटेल यांच्यासह कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे.
"तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
अहमदाबाद विमान अपघातात एमबीबीएसचा विद्यार्थी आर्यन राजपूतचा मृत्यू झाला आहे. आर्यन हा मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेर येथील जिगसौली गावचा रहिवासी होता. आर्यन हॉस्टेलच्या मेसमध्ये जेवत होता तेव्हाच एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान त्याच्या हॉस्टेलवर कोसळलं. या अपघातामुळे आर्यनच्या कुटुंबाला आणि संपूर्ण गावाला धक्का बसला आहे.