शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 09:37 IST

Ahmedabad Plane Crash: गेल्या आठवड्यात १२ जून रोजी अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या भीषण अपघातानंतर प्रसिद्ध गुजराती चित्रपट निर्माते महेश कलावाडिया उर्फ महेश जीरावाला हेसुद्धा बेपत्ता होते. आता त्यांचाही या अपघातात मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

गेल्या आठवड्यात १२ जून रोजी अहमदाबादमध्येएअर इंडियाच्या विमानाला झालेल्या भीषण अपघातात विमानातील प्रवासी आणि कर्मचाऱ्यांसह २४१ जणांचा मृत्यू झाला होता. त्याबरोबरच हे विमान ज्या ठिकाणी कोसळले त्या मेडिकल कॉलेजमधील निवासी डॉक्टर, मेसमधील कर्मचारी तसेच खालील रस्त्यावरून जात असलेल्या काही वाटसरूंनाही या भीषण अपघातात जीव गमवावा लागला होता. दरम्यान, या अपघातानंतर प्रसिद्ध गुजराती चित्रपट निर्माते महेश कलावाडिया उर्फ महेश जीरावाला हेसुद्धा बेपत्ता होते. आता त्यांचाही या अपघातात मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. DNA चाचणीनंतर महेश जीरावाला यांचा या अपघातात मृत्यू झाला असल्याचे अधिकृतरीत्या सांगण्यात आले.

एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला तेव्हापासून महेश जीरावाला हे बेपत्ता होते. तसेच त्यांच्या फोनचं शेवटचं लोकेशन हे घटनास्थळापासून ७०० मीटरवर सापडलं होतं, अशी माहिती त्यांच्या पत्नीने दिली होती. महेश हे सुद्धा या अपघातात सापडले असावेत, अशी शंका असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी डीएनएचे नमुने तपासणीसाठी दिले होते. त्यामधून आता महेश यांचा या अपघातात मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.

१२ जून रोजी झालेल्या विमान अपघानानंतर बेपत्ता असलेल्या महेश जीरावाला यांची जळालेली अॅक्टिव्हा स्कूटर घटनास्थळाजवळ सापडली होती. त्यामुळे महेश हेसुद्धा या विमान अपघातात सापडले असावेत अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. तसेच त्यांच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशनदेखील घटनास्थळाजवळच सापडलं होतं. त्यामुळे या अपघातात महेश यांचं काही तरी बरंवाईट झालं असावं, अशी शंका त्यांच्या कुटुंबीयांना वाटत होती, अखेरीस डीएनए चाचणीमधून त्यांना वाटत असलेली भीती खरी ठरली. मात्र तरीही महेश यांचे कुटुंबीय त्यांचा मृत्यू झाला आहे, हे मान्य करण्यास तयार नव्हते. अखेरीस पोलिसांनी अॅक्टिव्हाचा चेसिस क्रमांक आणि डीएनए अहवालासह सर्व माहिती दिली. तेव्हा कुटुंबीयांना शोक अनावर झाला.

दरम्यान, १२ जून रोजी दुपारी १.३९ वाजता एअर इंडियाचे विमान पडले होते. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमान लंडनला जाण्यासाठी झेपावले. पण, काही क्षणातच जमिनीवर कोसळले होते. यात वैद्यकीय शिक्षक घेणाऱ्या विद्यार्थ्यांचाही मृत्यू झाला आहे. या विमानातील केवळ एकच प्रवाशी वाचला.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAir Indiaएअर इंडियाahmedabadअहमदाबादGujaratगुजरात