शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 10:21 IST

Plane Crash prediction in marathi magazine: या दिवाळी अंकात केवळ विमान अपघाताबद्दलच नव्हे तर मोठी युद्धे होण्याबाबतचाही अचूक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Plane Crash prediction in marathi magazine: अहमदाबादहून लंडनला निघालेले विमान गुरुवारी  दुपारी दीडच्या सुमारास टेकऑफ घेतल्यावर लगेचच कोसळले ( Ahmedabad Plane Crash ) आणि मोठी दुर्घटना घडली. हे विमान अवघ्या तीन मिनिटांत एक मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर जाऊन आदळले. त्यामुळे विमानातील प्रवासी आणि हॉस्टेलमध्ये तेव्हा उपस्थित असलेले लोक यांचाही मृत्यू झाला. एअर इंडियाचे ( Air India ) बोईंग ७८७ ड्रीमलाइनर विमान एआय-१७१ असे हे विमान होते. अपघातात आतापर्यंत २६५ जणांचा मृत्यू झाला आहे. अशी एखादी मोठी विमान दुर्घटना होईल, अशी भविष्यवाणी अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठा (Astro Sharmistha) नावाच्या एक्स हँडलवरून करण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता एका मराठी दिवाळी अंकातील भविष्यवाणीचा फोटोही व्हायरल होत आहे. या दिवाळी अंकात केवळ विमान अपघाताबद्दलच नव्हे तर मोठी युद्धे होण्याबाबतचाही अचूक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मराठी दिवाळी अंकात नेमके काय?

विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर सध्या एका मराठी दिवाळी विशेषांकाचा फोटो व्हायरल होतो आहे. या फोटोत हा दिवाळी विशेषांक २०२४ मधील असल्याचे दिसते. यातील पान क्रमांक २७३ वर श्री. सिद्धेश्वर मारटकर यांनी भविष्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार, मे आणि जून २०२५ या काळात मोठी युद्धे, स्फोटक घटना, अपघात किंवा घातपात शक्य असल्याची भविष्यवाणी करण्यात आली होती. या भविष्यावाणी विस्तृत अंदाज व्यक्त करताना शेवटच्या परिच्छेदात विमान अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. शेवटच्या परिच्छेदात लिहिले आहे की- 'शनी मंगळाचा षडाष्टक योग मोठ्या युद्धासाठी पोषक असून काही देश युद्धाच्या उंबरठ्यावर उभे असतील. या योगामुळे मोठे अपघात / घातपात / अतिरेकी कारवाया / गूढ मृत्यू यातून मोठी हानी संभवते. मोठे विमान अपघात किंवा हवाई हल्ले यातून मोठी हानी संभवते. क्षेपणास्त्रांचा मोठ्या प्रमाणावर वापर होईल. सरकारी कर्मचारी, डॉक्टर यांचे संप, बंद या काळात संभवतात.' सध्या या मराठी दिवाळी विशेषांकाचा फोटो व्हायरल होताना दिसत आहे.

दरम्यान, अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठा (Astro Sharmistha) नावाच्या हँडलवरूनही भविष्यवाणी करण्यात आली होती. गेल्या वर्षी २९ डिसेंबर २०२४ ला तिने पुढील वर्षासाठीची (२०२५ साठी) भविष्यवाणी केली होती. त्यात तिने भारतीय हवाई क्षेत्राबाबतही भविष्यवाणी केली होती. यात एका मोठ्या विमान अपघाताची शक्यता असल्याचे म्हटले होते. तिची पोस्ट तिने पुन्हा ५ जूनला रिपोस्ट करत मी आजही विमान अपघाताची शक्यता असल्याचे सांगत असल्याचे म्हटले होते. आणि दुर्दैवाने अवघ्या सात-आठ दिवसांत तिची ही भविष्यवाणी खरी ठरली.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादAir Indiaएअर इंडियाAccidentअपघातairplaneविमान