शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 09:21 IST

Ahmedabad Plane Crash, Air India: गुरुवारी झालेल्या विमान दुर्घटनेत तब्बल २६५ जणांचा मृत्यू

Ahmedabad Plane Crash, Air India: गुरुवारचा दिवस हा भारतासाठी आणि अनेक कुटुंबांसाठी काळा दिवस ठरला. दुपारी दीडच्या सुमारास अहमदाबादहून लंडनला निघालेले विमान टेकऑफ घेतल्यावर लगेचच कोसळले. विमान एक मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर जाऊन आदळले. त्यामुळे विमानातील प्रवासी आणि हॉस्टेलमध्ये तेव्हा उपस्थित असलेले लोक यांचा मृत्यू झाला. या विमान अपघातात उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील अकोला भागातील एका जोडप्याचाही मृत्यू झाला. अपघातात जीव गमावलेले नीरज लवानिया आणि त्यांची पत्नी लंडनला निघाले होते. नीरज वडोदराच्या फेदर स्काय विलास कॉलनीत आपल्या कुटुंबासह राहत होते आणि एका कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करत होते.

भावाला शेवटचा फोन केला...

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ९ वाजता नीरजने त्याचा भाऊ सतीशला फोन करून तो टॅक्सीने विमानतळावर निघाल्याचे सांगितले. त्यानंतर कुटुंब त्याच्याशी संपर्क साधू शकले नाही. अपघाताची बातमी मिळताच कुटुंबात आणि गावात शोककळा पसरली. कुटुंबातील सदस्य हेल्पलाइन नंबरवर सतत संपर्क साधत आहेत, परंतु अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. साऱ्यांच्याच कुटुंबातील सदस्य विमानतळावर रडत आहेत. त्यांच्या प्रियजनांना शोधत आहेत. अपघातानंतर तेथे गोंधळाचे वातावरण आहे. अपघाताचे भयानक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

एकूण २६५ जणांचा मृत्यू

अहमदाबाद, गुजरात येथून गॅटविक, लंडनला जाणारे एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलाइनर विमान एआय-१७१ गुरुवारी उड्डाणानंतर लगेचच कोसळले. या अपघातात आतापर्यंत २६५ जणांचा मृत्यू झाला आहे. उपायुक्तांनी याची पुष्टी केली आहे. या विमानात २३० प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्ससह एकूण २४२ जण होते. त्यापैकी 11A या सीटवर बसलेला एकमेव माणूस अपघातात बचावला. बाकी सर्वजण मरण पावले.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादairplaneविमानAccidentअपघातAir Indiaएअर इंडिया