शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
5
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
6
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
7
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
8
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
9
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
10
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
11
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
12
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
13
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
14
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
15
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
16
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
17
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
18
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
19
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
20
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल

दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 19:09 IST

Air India Flight AI171 Crash: एअर इंडिया असे नादुरुस्त विमान लंडनच्या सात हजार किमीच्या अंतरासाठी कसे पाठवू शकते, असा सवाल आता उपस्थित होत आहे. 

लंडनला जाणारे एअर इंडियाचेविमान दिल्लीहून अहमदाबादला आल्याचा दावा एका व्यक्तीने केला आहे. या विमानात काहीतरी असामान्य वाटत होते, विमानातील सीटवरील डिस्प्ले, बटन काम करत नव्हते, एसीही काम करत नव्हते, असा दावा या व्यक्तीने केला आहे. 

आकाश वत्स नावाच्या या व्यक्तीने आपण त्या विमानातून प्रवास केल्याचे म्हटले आहे. अहमदाबाद वरून उड्डाण करण्यापूर्वी मी त्याच फ्लाइटमध्ये होतो. मी दिल्लीहून अहमदाबादला आलो होतो. मला विमानात असामान्य गोष्टी दिसल्याचे त्याने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच या पोस्टमधील व्हिडीओत विमानातील एसी काम करत नसल्याने आपण आणि इतर प्रवासी मॅकझीनने हवा घालत असल्याचे म्हटले आहे.

हे व्हिडीओ त्याने एअर इंडियाला एक्सवर पाठविण्यासाठी रेकॉर्ड केले होते. या पोस्टमधील त्याच्या दाव्याने एअर इंडियातील एसी काम करत नव्हता, डिस्प्लेचा टच काम करत नव्हता, क्रू मेंबरशी बोलण्यासाठी असलेला फोनही काम करत नसल्याचे समोर येत आहे. एअर इंडिया असे नादुरुस्त विमान लंडनच्या सात हजार किमीच्या अंतरासाठी कसे पाठवू शकते, असा सवाल आता उपस्थित होत आहे. 

अहमदाबादहून दुपारी १:३८ वाजता निघालेले हे विमान बोईंग ७८७-८ विमान होते ज्यामध्ये २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. यापैकी १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश नागरिक, १ कॅनेडियन नागरिक आणि ७ पोर्तुगीज नागरिक होते.जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात येत आहे. अधिक माहिती देण्यासाठी एअर इंडियाने १८०० ५६९१ ४४४ हा प्रवासी हेल्पलाइन क्रमांक देखील सुरू केला आहे. 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादAir Indiaएअर इंडियाairplaneविमानGujaratगुजरातAccidentअपघात