एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 20:45 IST2025-06-14T20:44:44+5:302025-06-14T20:45:13+5:30
Ahmedabad Air India plane crash: विमान अपघातातील मृतांचा आकडा आता २७५ झाला असून २४० जणांचे डीएनए घेण्यात आले आहेत. यापैकी सहा जणांचे डीएनए जुळले आहेत.

एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना एअर इंडिया २५ लाख रुपये देणार आहे. टाटा सन्सने यापूर्वीच १ कोटी रुपये देणार असल्याची घोषणा केली होती. यामुळे आता मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येक व्यक्तीमागे १.२५ कोटी रुपये मिळणार आहेत.
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
गुरुवारी, १२ जून रोजी दुपारी १.३९ मिनिटांनी एअर इंडियाचेअहमदाबादहून लंडनला जाणारे विमान विमानतळाबाहेर जाताच कोसळले होते. पायलटने मदतीचा मेसेज एअर कंट्रोलला देताना विमानाचे इंजिन फेल झाल्याचे सांगितले होते. विमानतळापासून दोन किमी अंतरावरील मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर हे विमान कोसळले. यामुळे मृतांचा आकडा वाढला आहे. या विमानातून एकूण २४२ जण प्रवास करत होते. तर हॉस्टेलच्या मेसमध्ये इंटर्न डॉक्टर जेवण करत होते. या कॉलेजच्या ३५ जणांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.
विमान अपघातातील मृतांचा आकडा आता २७५ झाला असून २४० जणांचे डीएनए घेण्यात आले आहेत. यापैकी सहा जणांचे डीएनए जुळले आहेत. अद्याप ४० हून अधिक लोकांवर उपचार सुरु आहेत. या विमान अपघातात एकच व्यक्ती वाचला आहे. डॉक्टरांच्या असोसिएशनने या अपघातात जीव गमावलेल्या डॉक्टरांना, विद्यार्थ्यांना तसेच कर्मचाऱ्यांनाही मदत करण्याचे आवाहन टाटा सन्सचे अध्यक्ष चंद्रशेखन यांना पत्र लिहून केले आहे.
टाटा सन्सने उपचाराचा सर्व खर्च आपण करणार असल्याचे म्हटले आहे. तसेच बीजे मेडिकल कॉलेजला त्यांची इमारत पूर्ण बांधून देण्यास मदत करणार असल्याचे म्हटले आहे.