शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 17:23 IST

What Is MAYDAY Call Meaning: मेडे कॉल म्हणजे नेमकं काय असतं? तो का दिला जातो? त्याचा अर्थ काय असतो? याची माहिती जाणून घेऊयात...

Ahmedabad Air India Plane Crash:अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळ्याची मोठी दुर्घटना घडली. अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या या विमानत क्रू मेंबरसह एकूण २४२ प्रवासी होते. विमानानं अहमदाबाद विमानतळावरुन उड्डाण घेतल्याच्या काहीच मिनिटांत ते खाली कोसळलं. पण त्याही परिस्थितीत वैमानिकानं MAYDAY कॉल दिला होता अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे विमानात काहीतरी गडबड आहे याची कल्पना वैमानिकाला आली होती. हाच MAYDAY कॉल म्हणजे नेमकं काय असतं? तो का दिला जातो? त्याचा अर्थ काय असतो? याची माहिती जाणून घेऊयात...

अहमदाबाद विमान दुर्घटनेआधी वैमानिकाने अपघाताच्या काही सेकंद आधी एटीसीला (एअर ट्राफिक कंट्रोल) MAYDAY कॉल दिला होता. हवाई क्षेत्रातील प्रवासी वाहतूक परिभाषेत MAYDAY कॉल हा आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त असा संकटाचा कॉल आहे. जो आपत्कालीन परिस्थितीचा सिग्नल म्हणून दिला जातो. 

MAYDAY कॉल केव्हा दिला जातो?हा एक रेडिओद्वारे दिला जाणारा सिग्नल आहे, जो खूप गंभीर परिस्थितीत, जीवाला धोका असल्यास वापरला जातो. तो तीन वेळा दिला जातो. कारण यामुळे स्पष्ट होतं की हा विनोद किंवा चुकीचा कॉल नाही, तर खरी आपत्ती आहे. हा कॉल पुढील गंभीर परिस्थितींमध्ये दिला जातो. १. विमान किंवा जहाज अपघाताच्या उंबरठ्यावर असेल२. इंधन संपण्याची स्थिती३. इंजिन फेल होणे४. हवामान खराब होऊन विमानाचे नियंत्रण गमावणे५. आग लागणे६. प्राणघातक वैद्यकीय आपत्ती ७. दहशतवादी हल्ला किंवा विमान अपहरण

MAYDAY कॉलचा उद्देश काय?MAYDAY कॉलचा उद्देश हा जवळच्या ATC (Air Traffic Control) किंवा नौदल नियंत्रणेला लगेच सतर्क करणे असा असतो. जेणेकरुन तातडीने मदत मिळावी. जसे की रेस्क्यू टीम, अग्निशमन दल आणि इतर तांत्रिक यंत्रणा तातडीने घटनास्थळी पोहोचाव्यात यासाठी या कॉलची मदत होते. यासोबत त्या परिघात इतर विमानांच्या वाहतूक रोखण्यासाठीही अलर्ट या माध्यमातून मिळतो.

अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेशअहमदाबाद दुर्घटनेत वैमानिकाने दिलेला कॉलअहमदाबादच्या दुर्घटनाग्रस्त विमानात क्लाईव्ह कुंदर हे फर्स्ट ऑफीसर होते. तर सुमित सबरवाल आणि अपर्णा महाडिक हे सहकारी क्रू होते. एअर ट्राफिक कंट्रोलला MAYDAY कॉल दिला गेला होता. पण हा कॉल दिल्याच्या पुढच्याच सेकंदात विमान क्रॅश झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे विमानात काहीतरी बिघाड झाल्यानं ही घटना घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाGujaratगुजरातahmedabadअहमदाबादAir Indiaएअर इंडियाairplaneविमानAccidentअपघात