शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसला मजबूत करण्यामध्ये अहमद पटेल यांचा मोठा वाटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2020 04:22 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी; राष्ट्रपती, सोनिया गांधींकडून श्रद्धांजली अर्पण

n लोकमत न्यूज नेटवर्कनवी  दिल्ली : काँग्रेसला मजबूत करण्यामध्ये अहमद पटेल यांचा मोठा वाटा होता. ही त्यांची कामगिरी सर्वांच्या नेहमीच लक्षात राहिल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांसह अनेक मान्यवर नेत्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

अहमद पटेल हे अत्यंत चाणाक्ष बुद्धीचे नेते होते असेही नरेंद्र मोदी म्हणाले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सांगितले की, अहमद पटेल यांच्यामध्ये रणनीतीकार व  जनाधार असलेले नेते अशा दोन्ही गुणांचे मिश्रण होते. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी सांगितले की, अतिशय मृदू स्वभावाचे असलेल्या अहमद पटेल यांनी असंख्य माणसे जोडली होती. राजकीय वर्तुळात त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. सगळ्याच पक्षांच्या नेत्यांशी अहमद पटेल यांचे उत्तम संबंध होते. केंद्रीय मंत्री अमित शहा, प्रकाश जावडेकर, राजनाथसिंह, स्मृती इराणी, काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी आदी मान्यवरांनीही अहमद पटेल यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

पक्ष कार्याला वाहून घेतले होते -सोनिया गांधीआयुष्यभर काँग्रेस पक्षाच्या कार्याला वाहून घेतलेले अहमद पटेल यांच्या निधनाने मोठी हानी झाली आहे. ते माझे अतिशय विश्वासू सहकारी होते. प्रामाणिकपणा, कामाविषयी असलेली समर्पण वृत्ती, नेहमी मदत करण्यासाठी तत्पर असणे हे दुर्मीळ गुण त्यांच्याकडे होते.     -सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष

गरिबांच्या कल्याणासाठी कार्यरत -मनमोहनसिंगकाँग्रेसच्या सर्वात विश्वासू नेत्यांपैकी एक असलेले अहमद पटेल हे गरीब व तळागाळातल्या लोकांच्या कल्याणासाठी आयुष्यभर झटले.     -मनमोहनसिंग, माजी पंतप्रधान

निकटस्थ मित्र गमावला - विजय दर्डामी स्तब्ध झालो आहे. मी निकटस्थ मित्र गमावला आहे.  दिल्ली भेटीत आम्ही दोघांनी एकत्र बसून देश आणि प्रदेशाच्या राजकारणावर चर्चा केली नाही, असे कधी घडले नाही. अहमदभाई यांचे व्यक्तिमत्त्व असे होते की, ते सर्व पक्षांच्या नेत्यांमध्ये लोकप्रिय होते. ते शब्दांचे धनी होते. जे बोलले ते पूर्ण करण्यासाठी जीव ओतून प्रयत्न करीत होते. त्यांची राजकीय जाण अनोखी होती. गांधी कुटुंबासोबत असलेली त्यांची जवळीक लपून राहिली नव्हती. जेव्हा जेव्हा पक्षासमोर मोठे संकट उभे ठाकले त्यावेळी त्यांनी मोठ्या कौशल्याने ते सोडवले. त्यामुळेच सोनिया गांधी त्यांचे मत जाणून घेतल्यानंतरच निर्णय घेत राहिल्या. बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या अहमदभाई यांच्या जाण्याने काँग्रेसला झालेल्या नुकसानीची हानी भरून निघणे शक्य नाही. माझ्याप्रती त्यांना वाटणारी विशेष जवळीक शब्दांमध्ये व्यक्त करणे शक्य नाही.-विजय दर्डा, माजी खासदार आणि चेअरमन, लोकमत एडिटोरिअल बोर्ड

 

टॅग्स :Ahmed Patelअहमद पटेलSonia Gandhiसोनिया गांधी