'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 20:44 IST2025-07-12T20:43:52+5:302025-07-12T20:44:03+5:30

अहवालात असेही सांगण्यात आले आहे की, FAA ची ही चेतावनी अनिवार्य नव्हती, तर केवळ एक अॅडव्हायजरी होती. यामुळे याच्याशी संबंधित तपासणी केली गेली नाही. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण जर ही तपासणी वेळेवर झाली असती तर कदाचित अपघात टाळता आला असता.

ahemdabad air india plane crash If only this one thing had been heard about the fuel control switch would the Ahmedabad plane crash have been avoided FAA had warned in 2018 | 'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा

'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा

अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडियाच्या AI171 या विमान अपघातासंदर्भातील प्राथमिक तपास अहवाल समोर आला आहे. या अहवालात खुलासा करण्यात आला आहे की, २०१८ मध्ये, यूएस फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने (FAA) बोईंग विमानातील फ्यूल कंट्रोल स्विचच्या लॉकिंग फीचरच्या संभाव्य समस्येसंदर्भात एक विशेष एअरवर्दीनेस सूचना बुलेटिन (SAIB No. NM-18-33) जारी केले होते. या बुलेटिनमध्ये B787-8 सारख्या विमानांचा देखील समावेश होता, ज्यांत तेच पार्ट नंबर असतात, जसे अपघातग्रस्त विमानांत होते.

काय आहे फ्यूल कंट्रोल स्विचची लॉकिंग फीचर समस्या? -
फ्यूल कंट्रोल स्विच लॉकिंग फीचर एक सुरक्षा प्रणाली आहे, जी विमानाच्या इंजिनमधील फ्यूल सप्लाय आणि कट-ऑफ दरम्यान अनवधाने होणारे ऑपरेशन रोखते. FAA च्या अहवालानुसार, जर हे लॉकिंग फीचर निष्क्रिय झाले, तर स्विच न उचलताच, दोन्ही पोझिशन (ON आणि OFF) दरम्यान बदलता येऊ शकते. यामुळे अनवधानाने इंजिन बंद पडण्यासारखी गंभीर घटना घडू शकते.

FAA अहवालाकडे दुर्लक्ष झाले -
अहवालात असेही सांगण्यात आले आहे की, FAA ची ही चेतावनी अनिवार्य नव्हती, तर केवळ एक अॅडव्हायजरी होती. यामुळे याच्याशी संबंधित तपासणी केली गेली नाही. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण जर ही तपासणी वेळेवर झाली असती तर कदाचित अपघात टाळता आला असता.

...तर हे पायलट इंजिन पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करत असल्याचे संकेत -
यासंदर्भात बोलताना निवृत्त आयएएफ पायलट कॅप्टन एहसान खालिद म्हणाले, फ्यूल कट-ऑफ स्विच पायलटद्वारे हाताळले जाते. ते स्वयंचलित नाही. जर इंधन कट-ऑफ स्विचची हालचाल रेकॉर्ड झाली असेल, तर हे पायलट इंजिन पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करत असल्याचे संकेत आहेत. मात्र, सत्य असे आहे की, इंजिन अपोआपच बंद झाले होते. पायलटने कोणतेही इनपुट दिले नव्हते, हे अहवालातून स्पष्ट होते.'

Web Title: ahemdabad air india plane crash If only this one thing had been heard about the fuel control switch would the Ahmedabad plane crash have been avoided FAA had warned in 2018

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.