येंदापेंदा येथे यात्रेनिमित्त कृषी व पशूप्रदर्शन

By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:13+5:302015-02-18T00:13:13+5:30

किनवट : पंचकमिटी नागनाथ संस्थान येंदापेंदा (नागढव) ता़ किनवट येथे ११ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत भव्य यात्रा व त्यानिमित्त विविध कार्यक्रम पार पडत आहेत़ त्याचाच भाग म्हणून १६ फेब्रुवारी रोजी भव्य कृषी व पशूप्रदर्शन पार पडले़ या प्रदर्शनाकडे जि़प़च्या कृषी सभापतींनी पाठ फिरवल्याचे दिसून आले़

Agricultural and animal husbandry exhibition at Yendapenda | येंदापेंदा येथे यात्रेनिमित्त कृषी व पशूप्रदर्शन

येंदापेंदा येथे यात्रेनिमित्त कृषी व पशूप्रदर्शन

नवट : पंचकमिटी नागनाथ संस्थान येंदापेंदा (नागढव) ता़ किनवट येथे ११ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत भव्य यात्रा व त्यानिमित्त विविध कार्यक्रम पार पडत आहेत़ त्याचाच भाग म्हणून १६ फेब्रुवारी रोजी भव्य कृषी व पशूप्रदर्शन पार पडले़ या प्रदर्शनाकडे जि़प़च्या कृषी सभापतींनी पाठ फिरवल्याचे दिसून आले़
१६ रोजी जि़प़नांदेड, पंचायत समिती किनवट व ग्रामपंचायत कार्यालय येंदापेंदा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य कृषी व पशूप्रदर्शन पार पडले़ यावेळी जि़प़चे बांधकाम सभापती दिनकर दहीफळे, पं़स़ सभापती अश्विनी शेडमाके, उपसभापती किशोर चव्हाण, पं़स़ सदस्य पांडुरंग कांबळे, नारायण दराडे, श्रीराम कांदे, आत्माराम मुंडे, पशूवैद्यकीय अधिकारी डॉ़एस़एऩ कांबळे, कृषी अधिकारी एस़एस़वावळे आदींची उपस्थिती होती़
या प्रदर्शनात देशी गायी, म्हशी, बैल, तसेच संकरीत गायी, बैल, वासरे तसेच फळे, भाज्या व इत्यादी कृषी प्रदर्शन ठेवले होते़ या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला़ परीक्षक म्हणून डॉ़कचरे, डॉ़दांडेगावकर, डॉ़शेख इरफान यांनी काम पाहिले़ हे प्रदर्शन यशस्वीतेसाठी कर्‍हाळे, गावंडे, गिरे, पाचपुते, खुपाशे, घुले आदींनी परिश्रम घेतले़ १७ रोजी महाशिवरात्रीनिमित्त महापूजा व इतर कार्यक्रम पार पडले़

Web Title: Agricultural and animal husbandry exhibition at Yendapenda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.