शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

Agniveer : अग्निवीरांसाठी खुशखबर! BSF-CISF मध्ये मिळणार १० टक्के आरक्षण, वय, फिजिकल टेस्टमध्येही सूट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 12:28 PM

Agniveer : अग्निवीरमधून लष्करात भरती झालेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे.

Agniveer  : अग्निवीरमधून लष्करात भरती झालेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. आता बीएसएफनंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात भरतीसाठी १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने या संदर्भात नोटीस जारी केली आहे. केंद्रीय सरक्षा दल अधिनियम १९६८ नुसार नियमांमध्ये संशोधनानंतर ही नोटीफीकेशन जारी केली. 

अग्निवीरांना निमलष्करी दलात सामावून घेण्याचा गृह मंत्रालयाचा निर्णय महत्त्वाचा आहे, कारण त्यामुळे माजी अग्निवीरांना निवृत्तीच्या वयापर्यंत रोजगाराच्या संधी मिळण्यास मदत होणार आहे. 

7th Pay Commission : मोदी सरकार कर्मचाऱ्यांना देणार खुशखबर! सातव्या वेतन आयोगानुसार २७,३१२ रुपयांची वाढ होणार

सरकारने यापूर्वी या नोकरीत दिलेल्या लाभांनुसार, यापैकी जास्तीत जास्त २५ टक्के अग्निवीरांना नंतर कायमस्वरूपी होण्याची संधी दिली जाईल. म्हणजे ४ पैकी एका अग्निवीरला कायमस्वरूपी नोकरी मिळेल. सैन्यात ४ वर्षानंतर परतलेले तरुण इतरांपेक्षा नोकरीसाठी अधिक पात्र असतील.

गृह मंत्रालय ४ वर्षांनंतर CAPF आणि आसाम रायफल्सच्या भरतीमध्ये अग्निवीरांना प्राधान्य देईल. बड्या कंपन्यांनी अग्निवीरांना नोकऱ्या देण्याची घोषणा केली आहे. अग्निवीरांसाठी ४ वर्षात पदवी अभ्यासक्रम असेल. ग्रॅज्युएशन पदवी अभ्यासक्रमाला भारतात आणि परदेशात मान्यता मिळेल. 

BSF आणि CISF मधील वयोमर्यादेत शिथिलता देण्यात आली आहे. उच्च वयोमर्यादा माजी अग्निवीरांच्या पहिल्या बॅचसाठी पाच वर्षे आणि इतर बॅचसाठी तीन वर्षांनी शिथिल केली आहे, योजनेंतर्गत २१ वर्षांच्या वरच्या वयोमर्यादेतही सशस्त्र दलात सामील होणार्‍यांना पहिल्या बॅचच्या बाबतीत लष्कर किंवा हवाई दल किंवा नौदलात चार वर्षांच्या सेवेनंतर वयाच्या ३० वर्षापर्यंत CISF द्वारे भरती करता येते. त्यानंतरच्या बॅचसाठी ते २८ वर्षांपर्यंत आहे.

बीएसएफ आणि सीआयएसएफमधील शारीरिक चाचणीतून सूट देण्यात येणार आहे. सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये, माजी अग्निशमन जवानांना दोन्ही दलांमध्ये भरतीसाठी शारीरिक कार्यक्षमता चाचणीतून सूट देण्यात आली आहे. ११.७२ लाखांहून अधिकचा सेवानिवृत्ती निधी अग्निवीर वयाच्या २१ ते २४ व्या वर्षी निवृत्त होईल. मात्र त्यांना सरकारकडून ११,७२,१६० रुपये मिळतील. यामध्ये कोणताही आयकर लागणार नाही. म्हणजेच हा रिटायरमेंट फंड असणार आहे. यात अर्धी रक्कम अग्निवीरांची आणिअर्धी सरकार देणार आहे.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानBSFसीमा सुरक्षा दल