शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

Agneepath Scheme: “गरज पडल्यास होऊ शकतात बदल..;” अनुराग ठाकुर म्हणाले, सरकार चर्चेसाठी तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 23:53 IST

Agneepath Scheme: लष्कर भरतीसंदर्भात केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात देशभरात आंदोलने सुरू आहेत. दरम्यान, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर यांनी अग्निपथ योजनेबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

Agneepath Scheme: लष्कर भरतीसंदर्भात केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात देशभरात आंदोलने सुरू आहेत. अनेक ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण घेतले आहे. दरम्यान, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर यांनी अग्निपथ योजनेबाबत मोठे वक्तव्य केले आहे. अनुराग ठाकुर यांनी या योजनेला विरोध करणाऱ्या तरुणांना हिंसाचार थांबवावा आणि चर्चेसाठी पुढे यावे, असे आवाहन केले आहे.

“सरकार खुल्या मनानं त्यांच्या तक्रारी ऐकण्यास आणि आवश्यकता भासल्यास बदल करण्यास तयार आहे. अग्निपथ योजना नरेंद्र मोदी सरकारद्वारे भविष्यात देशाला अधिक सुरक्षित बनवण्यासाठी आणि देशातील तरुणांना संधी देण्यासाठी घेण्यात आलेला एक ऐतिहासिक निर्णय आहे,” असं अनुराग ठाकुर म्हणाले. टीव्ही ९ समुहातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांनी यावर भाष्य केलं. ज्या तरुणांना देशाच्या सैन्यदलात सहभागी व्हायचं आहे, ते कधीही हिंसेचा मार्ग अवलंबणार नाहीत. परंतु बदल रोखण्याच्या अजेंड्यात असलेल्या राजकीय पक्षांनी तरूणांना उकसवण्याचं काम केलं असल्याचंही ते म्हणाले.

खुल्या मनानं विचार करण्यास तयार“मी देशातील तरुणांना विनंती करू इच्छितो की हिंसाचाराचा मार्ग तुम्हाला कुठेही नेणार नाही. लोकशाहीत तुम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, पण सरकारी मालमत्तेचं नुकसान करण्याचा नाही. लोकशाहीत हिंसाचाराला स्थान नाही,” असंही अनुराग ठाकुर म्हणाले. जर तुमच्याकडे कोणत्याही चांगल्या सूचना असतील तर त्या लोकशाहीच्या मार्गानं माध्यमांसमोर ठेवू शकता किंवा आम्हाला सांगू शकता. सरकार खुल्या मनानं त्यावर विचार करण्यासाठी सदैव तयार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :Agneepath Schemeअग्निपथ योजनाAnurag Thakurअनुराग ठाकुरIndiaभारत