शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

अग्निपथचा आगडोंब: बिहारमधील हिंसक विरोधामागे कोचिंग क्लासेसचा हात, पोलिसांच्या हाती पुरावे, व्हॉट्सॲप संदेशातून मिळाली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2022 07:14 IST

Agneepath Protest: बिहारमध्ये अग्निपथ योजनेला हिंसक विरोध करण्यामागे काही कोचिंग संस्थांचा  हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत पोलिसांच्या हाती काही भक्कम पुरावे लागले आहेत. त्याआधारे कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

पाटणा : बिहारमध्ये अग्निपथ योजनेला हिंसक विरोध करण्यामागे काही कोचिंग संस्थांचा  हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत पोलिसांच्या हाती काही भक्कम पुरावे लागले आहेत. त्याआधारे कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. प्रशासन दोषींची ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत आहे. राज्याची राजधानी पाटण्यापासून राज्याच्या जिल्हा मुख्यालयी असणाऱ्या काही कोचिंग सेंटरच्या परिसरात विद्यार्थ्यांनी जाळपोळ केल्याचे उघड झाले आहे.

पाटण्याचे जिल्हाधिकारी डॉ. चंद्रशेखर सिंह यांनी सांगितले की, अटकेतील काहीजणांच्या मोबाइलमध्ये काही कोचिंग सेंटरचे व्हिडिओ फुटेज व व्हॉट्सॲप संदेश मिळाले. त्यावरून जे कोचिंग सेंटर यात गुंतलेले आहेत, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. काही संचालकांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्यातील हिंसक घटना पाहून १५ जिल्ह्यांतील इंटरनेट सेवा ४८ तासांसाठी बंद ठेवण्यात आली आहे.

सोशल मीडियाचा वापर कमीआंदोलनातील विद्यार्थ्यांनी त्यांचे चेहरे कपड्याने झाकलेले आहेत. आरआरबी-एनटीपीसी विरोधात झालेल्या आंदोलनात कोचिंग संचालकांची नावे पुढे आली होती. त्यानंतर पोलिसांपासून बचाव करण्यासाठी विद्यार्थी चळवळ निश्चित करण्याची पद्धत बदलण्यात आली आहे. यासाठी आता सोशल मीडियाचा कमीत कमी वापर केला जात आहे.

हिमाचल प्रदेशात आंदोलनहिमाचल प्रदेशातही अग्निपथ योजनेच्या विरोधात जागोजागी निदर्शने केली जात आहेत. कांगडा जिल्ह्यातील जसूर भागात आंदोलन करण्यात आले. मंडी-पठाणकोट राष्ट्रीय महामार्गावर १० किलोमीटर वाहतूक ठप्प झाली होती. युवकांनी रेल्वे रुळांवर मोठ-मोठे दगड व लोखंडी गर्डर ठेवले होते. पोलीस पोहोचण्यापूर्वी युवक व दुकानदारांमध्ये दगडफेक झाली. आंदोलनकर्त्यांची ओळख पटवली जात असून, त्यांच्यावर एफआयआर दाखल केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले. 

‘त्यां’ना सरकारी योजनांचा लाभ नाहीबिहारमध्ये आंदोलनकर्त्या युवकांना आगामी काळात विविध सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही. आंदोलनात त्यांच्यावर गुन्हा व आरोपपत्र दाखल झाले तर लाभासाठी ते पात्र ठरणार नाहीत. या घटनांमध्ये सामील असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. त्यासाठी शेकडो आंदोलकांची ओळख पटविण्यात आली आहे. त्याचबरोबर निमलष्करी दलाच्या १० कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. यात रॅपिड ॲक्शन फोर्सची १, सीआरपीएफच्या ३ व सशस्त्र सीमा दलाच्या ६ कंपन्यांचा समावेश आहे. हिंसा करणाऱ्यांवर आजवर झाली नव्हती, अशा कारवाईचा इशारा दिला आहे. 

एवढ्या तीव्र विरोधाची अपेक्षा नव्हती : नौदलप्रमुख- अग्निपथ योजनेस एवढ्या तीव्र प्रमाणात विरोध होईल, अशी मला अपेक्षा नव्हती, असे प्रतिपादन नौदलप्रमुख ॲडमिरल आर. हरीकुमार यांनी केले आहे. हरीकुमार यांनी म्हटले की, अग्निपथ योजनेद्वारे भारतीय लष्करातील आतापर्यंतचा सर्वांत मोठा मनुष्यबळ व्यवस्थापन बदल हाेत आहे. - या योजनेवर आम्ही जवळपास दीड वर्ष काम केले आहे. मी या नियोजनात सहभागी होतो. ही योजना देश आणि युवक अशा दोघांच्याही हिताची आहे. त्यातून अधिक संधी निर्माण होतील. या योजनेमुळे आता एकाऐवजी चार लोकांना संधी मिळेल.

हरयाणात खाप पंचायतींचे युवकांना समर्थनहरयाणाच्या महेंद्रगडमध्ये संतप्त युवकांनी एका वाहनाला आग लावली. अनेक वाहनांच्या काचा फोडल्या. रेल्वे रुळांवर सामान फेकले व रुळ उखडण्याचाही प्रयत्न केला. राज्यातील खाप पंचायतीही युवकांच्या समर्थनार्थ उतरल्या आहेत. दादरीमध्ये विविध खाप पंचायती व लोक संघटनांनी निदर्शने केली. पिपली, जिंद, रोहतक आणि झज्जरमध्येही आंदोलन करण्यात आले.

काँग्रेस पक्ष तरुणांसाेबत : सोनिया गांधीकाँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी अग्निपथ योजनेविरोधात आंदोलन करणाऱ्या देशभरातील तरुणांना समर्थन देतानाच शांततेचे आवाहन केले आहे. कोविड-१९ चा संसर्ग झाल्यामुळे रुग्णालयात असलेल्या सोनिया गांधी यांनी आंदोलकांना उद्देशून एक निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, सरकारने पूर्णत: दिशाहीन असलेली योजना जाहीर केली आहे. पूर्णत: शांततेत आणि अहिंसक मार्गांनी आंदोलन करा. काॅंग्रेस तुमच्या साेबत आहे.

पंजाबमध्येही पोहोचले आंदोलनाचे लोण आंदोलकांनी लुधियाना रेल्वेस्थानक व सरकारी कार्यालयांची तोडफोड केली. पोलीस वाहनांचे मोठे नुकसान केले. रोलिंग हट्सला आगी लावल्या. यावेळी पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली. सहा युवकांना ताब्यात घेतले आहे. धार्मिक व सार्वजनिक ठिकाणी बंदोबस्त वाढवला आहे. 

४ दिवसांत ७०० कोटींची संपत्ती खाकआंदोलकांनी चार दिवसांत ७०० कोटींची संपत्ती भस्मसात केली. रेल्वेचे ६० डबे, ११ इंजिनांना आगी लावण्यात आल्या. याबरोबरच अनेक मालमत्तांनाही आगी लावल्या. जेवढ्या किमतीची मालमत्ता जाळली, त्यात बिहारला १० नवीन रेल्वे मिळू शकल्या असत्या.

टॅग्स :Agneepath Schemeअग्निपथ योजनाBiharबिहारPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी